Marathi Biodata Maker

तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...

Webdunia
शुक्रवार, 6 जुलै 2018 (12:31 IST)
सकाळच्या धामधुमीत असली की फक्त जरा गरमागरम डब्यांची झाकणे लावा. पोरांची तयारी करते तेव्हा जरा बॅग उचलून हातात द्या. ऑफिसला निघताना "आज लवकर येतो " असं जरा हसून म्हणा. ऑफिसला गेल्यावर एक मीस कॉल देऊन कळवा पोहचलो ग व्यवस्थित. उगाच तिला असाच छान नवरा बायकोचा विनोद पाठवा. संध्याकाळी घरी आलात की हसून तिला मिठीत घ्या.
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
कधीतरी सुट्टीच्या दिवशी तिला निवांत झोपू द्या. आवडीचा नाश्ता आणि चहा बनवून मग तिला उठवा. उगाच काही कारण नसताना तिच्या आई वडिलांशी बोला. तिला फोन देताना मात्र "झालं बरं माझं तक्रार करून" असं उगाच चिडवा. तिच्या मित्र मैत्रिणीच्या टवाळक्या चर्चेत उगाच तिला टाळी द्या.
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
कधी फावल्या वेळेत "बस जरा डोक्याची मालिश करून देतो" म्हणा. कधी ती अंघोळ करून आली की लाडाने तिचे केस पुसत गप्पा मारा. तिच्या प्रत्येक ओल्या बटीला अलगद कळून येईल असे खेचा. चिडणार नाही ती, " काय रे तू पण, बघ ना जरा नीट" म्हणून खोटा त्रागा करते. हसून जिरवा.
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
कधी किचन मध्ये गुरफटली असेल तर उगाच जाऊन तिथे भुणभुण घाला. कधीतरी आईपेक्षा काही चांगला स्वैंपाक केलाय बिनधास्त सांगा. एका हाताला तिला घेऊन दुसऱ्या हाती लेकराला घेऊन भर बाजारात चाला. न आवडत्या शॉपिंगला पण "तुझी चॉईस भन्नाट बाबा" असं म्हणून जिरवा. 
 
तिच्यावर प्रेम करणं जास्त अवघड नाहीये...
 
तिला जास्त काही लागत नसतं. तिची ती खूप समर्थ आहे. पण ती वेडी खूप भावनिक असते. गुंतून पडलेली असते तुमच्या क्षणाक्षणामध्ये. तुम्हालाही तिच्या प्रत्येक क्षणाचे आकर्षण असते ह्याची तिला  जाणीव करून देत राहा. जगण्याची कारणे खूप आहेत पण सगळ्यात महत्त्वाचे कारण ती आहे हे तिला कधीतरी कळू द्या.
 
तिच्यावर प्रेम करणं खरंच जास्त अवघड नाहीये....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

यश चोप्रा फाउंडेशनकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मुलांसाठी वायसीएफ स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 ची घोषणा

'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन असल्याचे उघड; पती फरमान खानवर 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अभिनेता आर. माधवनची 'नारळ बाग': ओसाड जमिनीवर फुलवलेली बाग चर्चेत; साडेतीन वर्षांच्या मेहनतीचे फळ

'धुरंधर'च्या यशानंतर सारा अर्जुनचे नशीब उजळले; आता भन्साळीच्या मेगा प्रोजेक्टमध्ये मधुबालाची भूमिका साकारणार

Wildlife Sanctuaries in Goa उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना गोव्यातील या ठिकाणी फिरायला घेऊ जा

पुढील लेख
Show comments