suvichar

खरेच देव नक्की कुणाला पावत असेल...

Webdunia
नास्तिक असुन तुला
दर्शनाला नेणारी मी
माझ्या इच्छेखातर
येणारा तू
 
हार-फुलांचा भाव करत
ताट घेणारी मी
दारातल्या भिक्षुकांना
मदत करणारा तू
 
रांगेत पुढे जाण्यासाठी
धडपडणारी मी
देवळाची सुबकता
न्याहाळाणारा तू
 
चिडुन नमस्कारासाठी
तुला खुणावणारी मी
देवळातली प्रसन्नता
अनुभवणारा तू
 
देवळातही चपलेची
काळजी करणारी मी
गरजुने नेली असेल
विचार करणारा तू
 
खरेच देव नक्की
कुणाला पावत असेल
माझ्यासारख्या आस्तिकाला
की तुझ्यासारख्या नास्तिकाला?

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

धुरंधर २' ओटीटीवर प्रदर्शित झाल्यावर परदेशात हिट ठरला

वृंदावनची ५ सर्वात प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे, या मंदिरांना भेट दिल्यावर तुम्हाला एक अनोखी शांती अनुभवायला मिळेल

बालपणीचा एक वेदनादायक अनुभव सांगताना सोनाली कुलकर्णी भावुक झाली; म्हणाली....

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

पंजाबी गायिका इंदर कौरचा संशयास्पद मृत्यू: कालव्यात आढळला मृतदेह; ६ दिवसांपासून होती बेपत्ता

पुढील लेख
Show comments