Marathi Biodata Maker

कृष्ण भेटायलाच पाहिजे....

Webdunia
सोमवार, 3 सप्टेंबर 2018 (11:17 IST)
कृष्ण भेटायलाच पाहिजे. 
आयुष्यात प्रत्येक वळणावर 
कृष्ण भेटायलाच पाहिजे.
 
मनातलं बोलायला, 
लिहिलेलं वाचायला, 
रेखाटलेलं दाखवायला, 
अन् कधी गायलेलं ऐकवायला ....
हक्काचा सवंगडी पाहिजे
आणि म्हणूनच प्रत्येकाला 
एक कृष्ण भेटायलाच पाहिजे
 
मुळात नात्यांच्या पलिकडचे 
भावबंध जोडणारा
एक हक्काचा 
सवंगडी पाहिजे.....
 
लहानपणापासून जपलेल्या 
अनेक नात्यांचीही 
वयं वाढत असतात
त्या नात्यांचे काळाप्रमाणे 
अर्थ बदलंत असतात
तस्संच....ते...पूर्वीचं...निर्व्याज.... अबोध नातं 
पुन्हा जमायला पाहिजे
आणि याकरताच 
आयुष्यात कृष्ण 
भेटायला पाहिजे......
 
"तो" कृष्ण "ती" ही 
असु शकते. 
आपल्या मनातलं 
सारं जाणणारी ती असते
कधीही आपलं खोलवर मन 
रीतं करता आलं पाहिजे
असा हक्काचा...विश्वासाचा 
कृष्ण भेटलाच पाहिजे........
 
आपल्या आजुबाजुला 
तो सापडेलंच असं नाही
जोडीदारामध्ये तो गवसेलंच 
असंही नाही
कुणीतरी जवळचं कृष्ण असण्याची भावनाही उर्मी देणारी पाहिजे
मात्र कधी मनाचा पेंद्या 
झाला नाही पाहिजे....
सुंदर विचारांची 
रम्य मुरली छेडणारा तो......
आयुष्यात प्रत्येकाला 
कृष्ण भेटला पाहिजे.
 
खरंच त्या मुरलीधराकडे 
मुरली होती का?
की अनेकांच्या मनात रुंजणारी 
त्याची ती आश्वस्त 
मैत्री होती का?
त्याच्या अस्तित्वाने अनेक मनांतून उमटत असाव्या आनंदलहरी
आणि त्यांचीच ऐकु येत असावी रुंजणारी मुरली...
 
अनेकांच्या मनामधे मुरणारा 
तो मुरलीमनोहर 
प्रत्येकाला भेटायला पाहिजे
आयुष्यात प्रत्येक वळणावर 
कृष्ण भेटायला पाहिजे.....  
प्रिती भिडे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धुरंधर' चित्रपटातील संजय दत्तचा पहिला लूक प्रदर्शित, या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर येणार

विवाहित चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडली समांथा रूथ प्रभू, नाते इंस्टाग्रामवर अधिकृत केले!

श्रेया घोषाल आणि जसपिंदर नरुला 23 वर्षांनंतर इंडियन आयडॉल मध्ये एकत्र गाणे गायले

सुपरस्टार रजनीकांत यांना IFFI 2025 मध्ये विशेष सन्मान प्रदान करण्यात येणार

साखरपुड्यानंतर रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचे लग्न चर्चेत; कधी आणि कुठे करणार जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

धर्मेंद्र यांच्या आयसीयू व्हिडिओ लीक प्रकरणात मोठी कारवाई; रुग्णालयातील आरोपी कर्मचाऱ्याला अटक

अभिनेत्री गिरिजा ओकने एआय-मॉर्फ केलेल्या अश्लील प्रतिमांबद्दल चिंता व्यक्त केली

सनी देओल नंतर जया बच्चन यांनी पापाराझींना फटकारले

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन

म्हणूनच लग्नापूर्वी दीपिका पदुकोण रणवीर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली नाही

पुढील लेख
Show comments