rashifal-2026

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

Webdunia
बुधवार, 2 जानेवारी 2019 (15:28 IST)
सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे
अशा सासुबाई प्रत्येक सुनबाईस मिळो..... 
 
सुनबाईस......
नको जाउ धास्तावून
सासुरवासाच्या दडपणाने
अग मीही गेलेय भांबावून
सुनरवासाच्या कल्पनेने
 
नको आणूस रूखवतात
भांडीकुंडी मोठी मोठी
भातुकलीचा खेळ आण
चुल बोळकी बार्बी छोटी
 
स्वच्छ कोवळ निरागस
त्या वेळचं मन आण
लहान होऊनच शिकवेन तुला
मनापासून सारं जाण
 
जाणून घे परंपरा 
आवडी निवडी रितीभाती
फार काही वेगळं नसतं
सांभाळून घे नातीगोती
 
इथे तुला रुजण्यासाठी
माझ्यातली हळवी माया देईन
तुझ्या बहरण्या फुलण्याची
मनापासून काळजी घेईन
 
विस्तारुदेत स्वप्नील हिरव्या 
फांद्या तुझ्या बहारदार
विसावूदेत त्यांच्या सावलीत 
घर आपले हळूवार
 
माझी अधुरी स्वप्ने सखे
तुलाच पुर्ण करायची आहेत
मी काढलेल्या रांगोळीत आता
रंग तुलाच भरायचे आहेत
 
पाळणाघर वृध्दाश्रम
संस्था दुरच राहूदेत
मुलाबाळात रमता रमता
स्वर्गाचेच दार उघडूदेत
 
तळहाताच्या फोडाप्रमाणे
जपेन तुला आई होऊन
राहशील ना ग राणी माझी 
सुन नाही लेक होऊन
 
तुझ्या आई बाबांच्या चिंतेने
नको होऊस अशी गंभीर 
त्यांची काळजी घेण्याकरता
लेक माझा आहे ना खंबीर....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

धर्मेंद्र यांच्या मृत्युपत्रातून उघड झाले मोठे रहस्य: मुलांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळाला नाही

माधुरी दीक्षितच्या 'मिसेस देशपांडे' या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सिद्धांत चतुर्वेदी भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्ही. शांतारामची भूमिका साकारणार, पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

बॉर्डर 2' मधील दिलजीत दोसांझचा पहिला लूक पोस्टर प्रदर्शित

श्रेयस अय्यर मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगच्या "धुरंधर" चित्रपटाने नवीन वाद निर्माण केला, बलुचिस्तानने चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला

India’s Beautiful Wildlife Train भारतातील सर्वात सुंदर वन्यजीव ट्रेन सफारी

विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी यांच्यावर 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप, राजस्थान पोलिसांनी केली अटक

बिग बॉस 19 च्या अंतिम फेरीत सलमान खान भावुक, धर्मेंद्र यांची आठवण येताच अश्रू अनावर

धर्मेंद्र यांना पहिल्यांदाच पुरस्कार मिळाल्यावर डोळ्यातून आनंदाश्रू आले

पुढील लेख
Show comments