Festival Posters

बायको मराठीची प्राध्यापिका असावी !

Webdunia
गुरूवार, 20 ऑगस्ट 2020 (16:35 IST)
नवऱ्याने नवे कपडे घातले अन् बायको समोर येवून उभा राहिला आणि म्हणाला - मी कसा दिसतो ते सांग बरं ....!!!!
 
 
बायको म्हणाली — 
मेघनाद अरि तात वधी ज्या नराला । 
ते नाम आहे द्वादशमहातील पाचव्याला। 
त्याची संहिता जे पूजिती अस्तमानी। 
तैसे तुम्ही दिसता मजला मनी। 
 
नवर्‍याला याचा अर्थ काही कळेना..? म्हणून त्याने एका विद्वान पंडिताला विचारलं तर त्यांनी सांगितलेला अर्थ खाली देत आहे.
मेघनाद म्हणजे इंद्रजित, त्याचा अरि म्हणजे शत्रू कोण ? 
तर लक्ष्मण (कारण लक्ष्मणाने इंद्रजिताला ठार केले होते) अशा लक्ष्मणाचा तात म्हणजे पिता कोण ? तर दशरथ. 
दशरथाच्या हातून अजाणता कोण मारला गेला ? 
तर श्रावणबाळ ( मराठी बारा महिन्यातील क्रमांक पाचवा महिना आहे श्रावण ) श्रावण महिन्याच्या अमावस्येला ( संहिता म्हणजे अमावस्या ) कोणता सण असतो ? 
तर पोळा. पोळ्याला कोणाची पूजा करतात ? तर बैलाची. ( त्या दिवशी बैलाला सजवतात ) 
त्या सजवलेल्या बैलासारखे तुम्ही दिसत आहात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सुभेदार' मालिकेत बबली दीदीच्या भूमिकेत मोना सिंगचा नवा अवतार

'तुंबाड २' मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची एन्ट्री; 'हस्तर'च्या रहस्यमय जगात साकारणार महत्त्वाची भूमिका!

या चित्रपटांमध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा एकत्र दिसणार

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नानिमित्त भारताच्या २३ शहरांमध्ये मिठाई वाटण्यात आली

राजपाल यादवने सुरु केला नवीन यूट्यूब चैनल

सर्व पहा

नवीन

होळीच्या दिवशी करणवीर बोहरा यांचे वडील महेंद्र बोहरा यांचे निधन

प्रियांका चोप्रा Oscars 2026 सादरीकरण करणार

अफेअरच्या अफवांवर भाष्य करत गोविंदा म्हणाले; त्यांना गोरी त्वचा असलेल्या महिला आवडतात

"हा माझा शेवटचा व्लॉग आहे," म्हणाले-बिग बॉस १७ फेम अनुराग डोवाल

Best Beaches Mumbai भेट देण्यासाठी मुंबईजवळील सर्वोत्तम समुद्रकिनारे

पुढील लेख
Show comments