Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

|| दिपावली समारोप ||

Webdunia
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019 (12:36 IST)
काय पण गंमत आहे बोलण्यात, 
आपण "शब्द" किती पटकन बदलतो,
कशालाही नावं देताना आपण त्यांच्या
"स्थाना"वरून निश्चित ठरवतो.
 
नितळ रस्त्यावरच्या खराब भागाला
"खड्डा" म्हणून हिणवतो.......
तर नितळ गालावरच्या छोट्या खड्ड्याला
"खळी" म्हणून खुलवतो.......
 
भिंतीवर पडलेल्या काळ्या ठिपक्याला
"डाग" म्हणून डावलतो.......
तर चेहऱ्यावर आलेल्या काळ्या डागाला
"तीळ" म्हणून गोंजारतो.......
 
तुटुन पडलेल्या केसांच्या पुंजीला
"जटा" म्हणून हेटाळतो.......
तर चेहऱ्यावर येणाऱ्या केसांच्या जोडीला
"बटा" म्हणून सरकवतो.......
 
असच असतं आयुष्यात आपल्याही
"सोबती"नेच आपण तसे घडतो.......
 
चुकीच्या सोबतीने माणूस बहकतो
"योग्य" सोबतीनेच अधिक बहरतो......
 
एकदा प्रविण दवणेंनी शांताबाई शेळके यांना विचारले की तुम्ही तुमच्या एका कवितेत आकाश आणि आभाळ असे दोन शब्द वापरलेयत... दोन्हींचाही अर्थ पहायला गेला तर एकच आहे... मग असे दोन वेगळे शब्द का ..?
शांताबाईंनी किती सुंदर उत्तर दिले पहा.. त्या म्हणाल्या..
 
...चुकतोयस तू प्रविण...
 
  ..जे निरभ्र असते ते आकाश..
आणि..
  ..जे भरून येते ते आभाळ..!!
   
आणि म्हणुनच् त्या निसर्गाच्या... त्या भगवंताच्या असिम कृपेला, त्याच्या मायेला आकाशमाया नाही तर आभाळमाया म्हणतात ..!! 
अशीच आभाळमाया तूम्हा सर्वा मध्ये राहू देत। दिवाळी सुंदर गेलीच असेल पुढील वर्ष आनंदी व भरभराटीचे जाऊदे.
 श्री गुरुचरणी हीच प्रार्थना।  
  || अलविदा दिपावली ||

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेत रोनित रॉय राजा सोमेश्वरची भूमिका साकारणार

३२ वर्षीय प्रसिद्ध रॅपरची आत्महत्या, कुटुंबाने त्याच्या पत्नीवर गंभीर गुन्ह्यांचा आरोप केला

हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय? चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

सुरक्षित इंटरनेट दिनी यूनिसेफ इंडिया सोबत आयुष्मान खुराना जोडला गेला

चित्रपट 'छावा' सध्या चर्चेत, पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार

सर्व पहा

नवीन

छावा चित्रपट बघून प्रेक्षक झाले भावूक

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात होणार

कैलास शिव मंदिर एलोरा

'छावा'ने बॉक्स ऑफिसवर 'पद्मावत'चा विक्रम मोडला ऐतिहासिक ओपनर बनला

रायगड मधील प्रबलगड किल्ल्याशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये

पुढील लेख
Show comments