Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिसळ : आयुष्य म्हणजे नात्यांची मिसळ

Webdunia
गुरूवार, 28 जुलै 2016 (12:38 IST)
आयुष्य म्हणजे नात्यांची मिसळ
आई वडील मूग मटकी कडधान्य
त्यांच्या शिवाय मिसळ ही कल्पनाच अमान्य
त्यांच्या मुळेच तर ती बनते सकस अन्न

बहीण भाऊ टमॅटो बटाटे वाटाणे
मिसळतील एकमेकात सहजपणे
मिळून येईल मिसळ मग छान दाटपणे

नातेवाईक म्हणजे मीठ लिंबू मसाला
चव हवी मस्त तर प्रमाणातच घाला
खारट आंबट मिसळ उगाच हवी कशाला

मित्र मैत्रिणी म्हणजे लाल मस्त तर्री
मिसळीला रसदार तीच करते खरी
हवीहवीशी चटकदार चव आणते भारी

जोडीदार कांदा डोळ्यात आणे पाणी
पण मिसळीला मजाही तोच तर आणी
फोडणीत हवाच शिवाय वरून त्याची पेरणी

मुलं कुरकुरीत शेव फरसाण चिवडा
त्यांच्यावीना मिसळ हा विचारच सोडा
अधुरा राहील ना सारा खटाटोप एवढा

शेजारी म्हणजे कोथिंबीर हिरवी गार
असेल तर मिसळीची वाढेल शोभा पार 
नसली तरी काही अडणार नाही फार

ऑफिस बॅास म्हणजे मलईदार दही
गोड असेल तरच मिसळीला सही
नाहीतर ठेवा दूरच घालू नका काही

मिसळ जमली चविष्ट तर रंगत हमखास
पण सर्वांच्याच नशिबी, नाती नसतात ना झकास
मग आयुष्यच सारे होऊन जाते उदास

पण बिघडली चव तरी प्रयत्न नाही सोडायचे
चवीनुसार पदार्थ कमी जास्त करत रहायचे
मनाच्या समजुतदारपणाचे पाणी थोडे घालायचे

हळूहळू मग जमेल मस्त भट्टी
मिसळीची चवीशी होईल छान गट्टी
सुखाशी मग आपली कायमची बट्टी                                  

मृदुल दामल

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments