Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कर्क राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

वेबदुनिया
WD

गुरूचे व्ययस्थानातील आणि तुमच्याच राशीतील भ्रमण, मंगळाचे तृतीय आणि चतुर्थस्थानातील भ्रमण त्याचप्रमाणे वर्षभर शनीचे सुखस्थानातील वास्तव्य यामुळे काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावे लागेत याचा अनुभव देणारे हे वर्ष आहे. वेळेला तडजोड करायची, परंतु आपले स्थान टिकवायचे हेच तुमचे ध्येय असते. आगामी वर्षात या सर्व गोष्टी पूर्वार्धात विनासायास सफल होतील.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकर ी...


धंदा, व्यवसाय व नोकरी

WD

जानेवारी, फेब्रुवारीत बदली आणि बढतीचे योग येतील. व्यापार उद्योगात एका हाताने द्यायचे आणि दुसर्‍या हाताने कमवायचे असा अनुभव येईल. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी जूनपर्यंत कामामध्ये विस्तार आणि गुंतवणूक करावी लागेल. त्याला फायदा जुलैनंतर मिळेल. नोकरदार व्यक्ततींना ज्यांना पदोन्नती किंवा जादा पगारवाढ पाहिजे असेल, त्यांना मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. मार्चपर्यंत चांगल्या प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. महिला शिक्षण व कला क्षेत्रात आघाडीवर राहतील.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमा न....


गृहसौख्य व आरोग्यमान

WD

नवीन वर्षे कौटुंबिक दृष्टीने साधारण आहे. शुक्राचे भ्रमण राशीच्या सप्तमस्थानात असल्यामुळे आला दिवस हसून साजरा कराल. याच दरम्यान घरातील सदस्य आणि त्यांच्या जीवनातील काही चंगले क्षण बघायला मिळतील. या वर्षी आरोग्याची थोडी कुरबूरही राहील. जून-जुलैमध्ये एखादी चांगली घटना घडल्याने घरात वातावरण प्रसन्न राहील. घरात नव्या पाहुण्याची भर पडेल. प्रवास व तीर्थयात्रा अचानक घडून येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा व शर्यतीत आघाडीवर राहता येईल. कर्क रास ही चर गुणधर्माची, जल तत्वाची आहे. तिचा अधिपती चंद्र व चिन्ह खेकडा आहे. शुभरंभ पांढरा, शुभरत्न मोती व आराध्य दैवत शकंर-गणपती आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा Buddha Purnima 2024 Wishes in Marathi

आम्रपाली जेव्हा गौतम बुद्धांवर मोहित झाली तेव्हा काय झाले?

सोन्याची जोडवी किंवा पैंजण का घालत नाही? कारण जाणून घ्या

Narasimha Mantra नृसिंह प्रभूंचे 10 मंत्र

नृसिंह जयंतीला या 7 वस्तू देवाला अर्पित करा, सर्व अडचणी दूर होतील

सर्व पहा

नक्की वाचा

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

Show comments