Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक भविष्यफल दि. ६ ते १२ जुलै २0१४

Webdunia
सोमवार, 7 जुलै 2014 (10:23 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगला लाभ घडेल. भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार जरूर जरूर करावा लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात सर्वत्र अडचणीचा सामना करावा लागेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर व उचित ठरेल. होणारा मनस्ताप टळेल.

वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहतील. वेळेवर सहकार्य मिळेल. अंतिम चरणात भागीदारीत असणारे वाद मिटतील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथस्थितीतच राहतील व वेळेवर मदत कार्य मिळू शकेल.

मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येईल. स्पर्धा परीक्षेमधील निकाल समाधानकारक हाती येऊन उत्साह वाढीस लागून सर्वत्र यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमाणात दूर होईल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहून यश दृष्टिक्षेपात येईल.

कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढीस लागू शकेल. अपेक्षित यश दृष्टीसमोर राहून यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक आवक समाधानकारकरीत्या राहून आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येईल व काळजीचे दडपण दूर होईल.

सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात नवोदित खेळाडूंना प्रसिद्धी व यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील. वेळेवर मदतीचे व सहकार्य करण्याचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास सर्मथस्थितीत राहतील. अंतिम चरणात कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील. कौटुंबिक सदस्य मडंळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येऊन मानसिक आनंद वाढेल.

कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीतच राहतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवींचे मार्गदर्शन घेणे चांगले ठरेल. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी ठरेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करतील. स्थगित व अपूर्ण व्यवहार कामे गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावरच राहू शकतील.

तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामानिमित्त करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. कोणत्याही बाबतीत अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होईल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक विशेष सावधानता ठेवूनच करणे उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान टळू शकेल.

वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. इतरांचा सल्ला फक्त ऐकणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती अनुकूल राहील. मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. महत्त्वपूर्ण स्वरूपाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे चांगले.

धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात चौफेर यश मिळेल. अपयशाचा सामना करावा लागणार नसून आर्थिक टंचाई जाणवणार नाही. हातात पैसा खेळता राहू शकेल. आर्थिक समस्या मिटतील. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागेल. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील. दगदग व त्रास सहन करावा लागेल. संयम ठेवणेच उचित ठरेल.

 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. उद्योग क्षेत्रातील करार व्यवहार भावी काळाच्या दृष्टीने लाभप्रद ठरतील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येऊ शकेल. अंतिम चरणात अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेणे उचित ठरेल. काही प्रमाणात जुन्या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत येतील व आर्थिक आवक चांगली राहील.

कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रा योग घडेल. यात्रा सफलतेच्याच मार्गावर राहील. नशिबाची साथ पाठीमागे राहील. त्यामुळे कोणतेही काम सहसा अपूर्ण व स्थगित स्थितीत राहणार नाही. यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात नोकरीत अधिकारीवर्ग आपल्यावर खूष राहील. त्यांनी आपल्यावर सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या मार्गावर राहील व समाधान लाभेल.

मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष सावधगिरी ठेवणे आवश्यक ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण करारावर स्वाक्षरी होण्याची दाट शक्यता आहे. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. त्यांच्याबाबत असणारी चिंता व काळजी मिटण्याच्या मार्गी राहील.

श्री. लक्ष्मण जोशी
सर्व पहा

नवीन

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

श्री कृष्ण कवच

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

Sai Baba Puja Mantra गुरुवारी करा साईबाबांची पूजा, उपवासाचे नियम मंत्र जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments