Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक भविष्यफल (6.4.14 ते 12.4.14)

Webdunia
मेष
व्यवहारांची माहिती, महत्त्वाची कागदपत्रे षष्ठात शनी राहू असल्याने जाहीर करू नका. शत्रूंपासून दूर ठेवा. यामधून प्राप्ती ते प्रतिष्ठा यामधील प्रश्न वेगाने सोडवता येतील. अचानक मंगलकार्य ठरावे. गुरू हर्षल केंद्रयोगातील चमत्कारिक प्रतिक्रियांनी विचलित होऊन कार्यमार्ग बदलण्याची आवश्यकता नाही. नोकरी उद्योगाचे नवे वेळापत्रक तयार होईल. पैसा मिळेल, नवे परिचय, नव्या उपक्रमांत उपयुक्त ठरतील. 

वृषभ
अवघड प्रश्न सोडवता येणार नाही, परंतु चतुर्थात गुरू, अष्टमांतील शनी राहू यांचा प्रतिष्ठेवरील आक्रमणाचा मार्ग बंद करता येईल.  गुरुवारच्या बुध हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित निर्माण होणारे काही प्रसंग परिवारातील प्रश्न सोडवतील. त्याचे परिणाम व्यापारी प्रगती, अर्थप्राप्ती, समाजकार्यातील यश, कला करार यांवर होतील. त्यातून नियमित उपक्रम व्यवस्थित सुरू ठेवता येतील. बाजार आणि प्रतिष्ठितांच्या संपर्कात त्यामुळे राहाता येईल.

मिथुन
राजकारण, शिक्षण, कला प्रांत, व्यापारी सौदे, दूरचे प्रवास, महत्त्वाचे करार यांचा समावेश त्यात करता येतो. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. काही प्रांतातील प्रभाव प्रगतीच्या नव्या प्रवासाला उपयुक्त ठरू शकतो. पराक्रमी शुक्र कला संगीतात उत्साहाचा आहे. त्यातून अर्थप्राप्ती वाढते. रवी हर्षल नवपंचम योगामुळे अवघड प्रकरण मार्गी लावता येतात. परंतु विचार ते कृती यांना प्रलोभनापासून मात्र दूर ठेवा.

कर्क
सिंह, सूर्य, पराक्रमी शुक्र व्यावहारिक उलाढालींना इभ्रत सांभाळणारी शक्ती देणार असल्याने बारावा गुरू, चतुर्थात शनी राहू यांच्यातील उपद्रवांची तीव्रता संकटाची ठरू शकणार नाही. गुरू हर्षल केंद्र योगातील चमत्कारिक प्रसंग, प्रार्थना आणि प्रेरणा यामधून नियंत्रणात ठेवता येतील. अर्थप्राप्ती, सामाजिक उपक्रम, अधिकारातील शक्ती, नवे करार यांचा समावेश त्यात राहील. शेती चांगली होईल.

सिंह
साडेसाती आणि व्ययस्थानी रवी या काळांत अधिकार आणि अर्थप्राप्तीने प्रश्न निर्माण होतात. आर्थिक नियोजनात व्ययस्थानातील रवी बुध व्यत्यय आणतात. सावध राहा. व्यत्यय प्रबल करू नका. नोकरी, धंदा, कला प्रांत, सामाजिक कार्ये यामध्ये प्रतिमा उजळत राहणारी आहे. शेती संशोधन त्यात महत्त्वाचे ठरू शकते. सतर्क राहून उलाढाल सुरू ठेवा. 

कन्या
लाभांत गुरू, पराक्रमी शनी राहू, मंगळवारी राशीस्थानी येत असलेला बुध कार्यप्रांतात उत्साह राहील. मिळणाऱ्या यशातून नवीन उपक्रमांचा शोध घेतला जाईल. संपर्क, चर्चा यांचा त्यासाठी उपयोग होईल. आर्थिक घडी बसेल. प्रवास होतील. शेतीत यश मिळेल. अधिकार वाढतील. व्यापारी निर्णय अचूक ठरतील. श्रीमारुतीची उपासना, आराधना उपक्रमांत निर्विघ्नता देऊ शकेल.

तूळ
संरक्षण व्यवस्था याच काळात मजबूत करणे योग्य ठरते. रविवारच्या रवी हर्षल नवपंचम योगातून तूळ व्यक्तींच्या संपर्क सफल योजना, परदेशात पोहचणे शक्य आहे. भक्तिमार्गातूनही आनंद मिळेल.  संधी, मध्यस्थी, योग्य प्रसंग यांचा उपयोग करा. नारळीपौर्णिमेच्या आसपासचा काळ महत्त्वाचा ठरेल. अधिकार वाढतील. पैसा मिळेल. नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. आरोग्यावर औषध सापडेल. शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. श्रीमारुतीची उपासना, आराधना ठेवा.

वृश्चिक 
भाग्यांत सूर्य बुध, दशमांत शुक्र, रविवारचा प्रबल सूर्य हर्षल नवपंचम योग अनिष्ट ग्रहांची दहशत  कमी करतील. आपली पावलं पुढे पडू लागतील. श्रीमारुतीची उपासना आराधना विचारातील निराशा कमी करते. यशस्वी नवीन प्रयोगातून काही प्रांतात प्रतिमा उजळून निघेल. साडेसाती, व्ययस्थानी शुक्र यांचा उपद्रव यात नसावा यासाठी श्री मारुतीची उपासना, आराधना, प्रयत्नात संयम, शिस्त यांचा समन्वय ठेवा. व्यापार वाढेल, सत्ता प्रबल होईल, अर्थप्राप्ती मजबूत करता येईल. बौद्धिक प्रभावाने कार्यप्रांतात चमकाल. गुरू हर्षल केंद्रयोगात सरळ मार्ग, कृती यांचा फायदा अधिक होतो.

धनु
सप्तमांत गुरू, भाग्यांत सूर्य, लाभांत शनी, राहू, मंगळवारचे बुध राश्यांतर. राशी कुंडलीमध्ये याच ग्रहांचा प्रभाव आहे. त्यातून अनेक क्षेत्रांतील धनू व्यक्ती आघाडीवर येऊ लागतील. गुरू हर्षल केंद्रयोग, अष्टमांत प्रवेशणारा मंगळ यांची आव्हाने प्रबल असली तरी शक्ती युक्ती समन्वय कार्यमार्ग निर्वेध करतो. त्यातून अर्थप्राप्ती वाढते. प्रतिष्ठा उंचावते. व्यापार भरभराटीला येतो. बौद्धिक क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. शासन, वादळी प्रश्न यांमध्ये मात्र सापडू नका.

मकर
सूर्य, गुरू, शनी, राहू पत्रिकेतील याच ग्रहांचे प्रतिसाद विचारांना वेग देतील. प्रगतीचे अधिराज्य अनेक क्षेत्रांत त्यातून उभं करता येईल. मंगळवारच्या बुध राश्यांतरापासूनच त्याची प्रक्रिया प्रचीतीस येऊ लागेल. बौद्धिक क्षेत्र, व्यवहारातील उलाढाल, राजकीय डावपेच, कलाविष्काराची प्रशंसा यांचा समावेश त्यात राहील. षष्ठातील मंगळाची शत्रूंवर दहशत असते. त्याचाही प्रगतीसाठी उपयोग होईल. त्यात कृषी प्रयोग, नवीन परिचय, प्रवास, चर्चा, भागीदारी, मोठय़ा वर्तुळातील प्रवेश यांचा समावेश राहील.

कुंभ
गुरूची कृपा, पराक्रमी येत असलेला मंगळ यांच्यामधून प्रयत्न-उपक्रम यांचा समन्वय साधता येईल; परंतु सूर्य, शनी, राहू सहज यशापर्यंत आपणास पोहचू देणार नाहीत. निराश होऊ नका. सरळ मार्ग, प्रयत्न यांचा उपयोग सुरूच ठेवा. षष्ठातील रवी दुश्मनांची नाकेबंदी करतो. रविहर्षल नवपंचम योगातील संधी अर्थप्राप्ती, सामाजिक प्रतिष्ठा, व्यापारी सौदे यासाठी लाभदायक ठरतील. मंगळवारी अमावास्या आहे, व्यवहार कागदावर आणि पक्के करू नका.

मीन
पराक्रमी गुरू, पंचमात सूर्य, सप्तमांत शनी राहू, मंगळवारी बुध पंचमात येत आहे. याच ग्रहकाळांत अनेक अवघड प्रकरण निकालात काढता येतील. नवीन उपक्रमांचे स्वरूप निश्चित करता येईल. बौद्धिक क्षेत्रात, राजकीय आणि व्यापारी प्रांतात मेष व्यक्तींचा प्रभाव वाढत राहणार आहे. षष्ठांत शुक्र, रविवारी चतुर्थात प्रवेश करीत असलेला मंगळ प्रपंचातील प्रश्न गरम करीत असतो. गुरू हर्षल केंद्रयोगात साहसी प्रयोग कटाक्षाने टाळावे लागतात. 

बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा Buddha Purnima 2024 Wishes in Marathi

आम्रपाली जेव्हा गौतम बुद्धांवर मोहित झाली तेव्हा काय झाले?

सोन्याची जोडवी किंवा पैंजण का घालत नाही? कारण जाणून घ्या

Narasimha Mantra नृसिंह प्रभूंचे 10 मंत्र

नृसिंह जयंतीला या 7 वस्तू देवाला अर्पित करा, सर्व अडचणी दूर होतील

Pune Porche Accident :अल्पवयीन आरोपीला दारू देणारा बारला सील केले

आयसीएमआरने कोवॅक्सिन वरील बीएचयूच्या अहवालावर प्रश्न उपस्थित केले

KKR vs SRH सामन्यात पाऊस पडला तर IPL फायनलचे तिकीट कोणत्या संघाला मिळेल? तपशीलवार जाणून घ्या

T20 World Cup 2024:भारत पहिल्यांदाच या संघांशी भिडणार, जाणून घ्या सामना कधी होणार

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

Show comments