rashifal-2026

साप्ताहिक राशिभविष्य (30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2014)

वेबदुनिया
मे
धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. नवनिर्मीतीचा आनंद घ्याल. कवि, कलाकारांना चांगल्या संधींचा लाभ घेता येईल. आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण धाडसी निर्णय घेण्यास प्रवृत्त करणारे राहील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. खेळाडूंना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. आपल्या कर्तृत्त्वाला चांगली झळाळी मिळेल.

वृषभ
व्यावसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. धनस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण आर्तिक उन्नती करणारे राहील. संततीची उन्नती होईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांना यश लाभेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता इलेक्टॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल.

मिथुन
तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. जुनी थकेलेली येणी वसूल होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल. शेअर बाजारातील गुंतवणूक आर्थिक फायदा करुन देईल. आपल्याच राशीतून होणारे चंद्राचे भ्रमणामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. आपल्या वृत्त्वावर सभोवतालच्या व्यक्ती हुरळून जातील. इच्छापूर्ती होईल.

कर्क
प्रयत्नांती परमेश्‍वर या उक्तीचा प्रत्यय येईल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकांरांची खरेदी कराल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्ययस्थ चंद्राचे भ्रमण कामानिमित्त दूरचे प्रवास घडवून आणणारे राहील. एखादा निर्णय आपण झटपट घेऊ शकणार नाही. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. कार्यक्षेत्रात विविध संधी उपलब्ध होतील. उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल.

सिंह
सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यांतून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. लाभस्थ चंद्राचे भ्रमण तरु.णांच्या कौशल्याला चांगला वाव देईल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. महत्त्वाच्या निर्णयात आपला पुढाकार व सल्ला उपयोगी पडेल. विश्‍वासाच्या जोरावर मोठे ध्येय गाठाल. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्यता आहे. आपली इच्छापूर्ती होईल. व्यवसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.

कन्या
एखादी शाब्बासकीची थाप पाठीवर पडल्यामुळे हायसे वाटेल. कर्तव्यभावना जागृक ठेवून कामाची आखणी केली जाईल. जुने मित्र भेटतील त्यांच्या बरोबर आनंद लुटण्याचे क्षण येतील. आकर्षक भेटवस्तू मिळतील. दशमस्थ चंद्राचे भ्रमण व्यवसाय उद्योगातून अभिनव तंत्र वापरल्यामुळे यश येईल. नव्या उमेदीने कामाला लागाल. व्यवसाय उद्योगातून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. नवीन परिचय होतील.

तूळ
व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला लाख मोलाचा ठरेल. नवीन जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल.

वृश्चि
परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. अष्टमस्थ चंद्राभ्रमणामुळे प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.

धन
आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल.दुसर्‍यांकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करुन घ्या. भागीदाराचे सहाकार्य चांगले राहील. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल.

मकर
विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. जनसंपर्कातून चांगला फायदा होईल. व्यवसायात नवे तंत्र अंमलात आणू शकाल. आपल्या कामाच्या पूर्ततेसाठी दुसर्‍यांवर अवलंबून राहू नका. वैराण वाळवंटाची वाट संपत आल्याची चिन्हे दिसून येतील. सामाजिक पत उंचावेल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी मिळेल. गुप्तवार्ता कानी येतील. अवाजवी धाडस करण्याचे टाळावे.

कुंभ
जुने मित्र भेटल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. नावीण्यपूर्ण कलाकृतींचा ध्यास घ्याल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आपल्या राशीच्या पंचमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. करमणूकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात यश लाभेल. व्यावसायीक प्रदर्शनातून चांगला फायदा होईल.

मीन
कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. आपल्या मतांचा आदर केला जाईल. घरातील व्यक्तींच्या मतांना दुजोरा दिलात तर आपला फायदा होईल. आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. राहत्या जागेचे किंवा व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटतील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.
सर्व पहा

नवीन

Margashirsha Guruvar 2025 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा

घरात अश्या प्रकारे कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती मिळेल

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी या वस्तूंचे दान करणे करिअरसाठी शुभ

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

Show comments