Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंह राशीच्या जातकांचे 2014मधील वार्षिक भविष्यफल

वेबदुनिया
WD


नवीन वर्षात गुरुचे लाभस्थानातील आणि व्ययस्थानातील भ्रमण, मंगळाचे धनस्थानातील आणि तृतीयातील भ्रमण आणि शनीचे अनुकूल वास्तव्य यामुळे तुमच्या नेतृत्वगुणांना ‍ आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला भरपूर वाव असेल. दानशूर म्हणूनच तुम्हाला ओळखतात. यंदा तरी ही संधी तुम्हाला चांगलीच लाभणार आहे. कारण जुनपर्यंत गुरूचे भ्रमण तुम्हाला शुभ आहे. देशात किंवा परदेशात कामाचा विस्तार कराल. जूननंतर आर्थिक गोष्टींवर लक्ष ठेवा. नाहीतर नाकापेक्षा मोती जड होईल. एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात नवीन करार करताना बेसावध राहू नका.

पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकर ी...


धंदा, व्यवसाय व नोकर ी

WD

नोकरदार मंडळींना जानेवारी, फेब्रुवारी किंवा जूननंतर बढती मिळेल. नोकरदार व्यक्तींच्या बर्‍याच वर्षाच्या इच्‍छा-आकांक्षा साकार करणारे वर्ष आहे. जूननंतर हळूहळू वरिष्ठ तुमच्यावर जबाबदार्‍या वाढवतील.

गाडी किंवा घर आणि इतर सुखसुविधा खरेदी करून जोडीदाराला खूश ठेवाल. जूननंतर मात्र गुरू व्यवस्थानात जाईल. त्यामुळे हात आखडता घेणेच चांगले. ज्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे, त्यंना फेब्रुवारी ते जून हा कालावधी विशेष चांगला आहे.

पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमा न...


गृहसौख्य व आरोग्यमान

WD

विवाहत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल, त्याचे विवाहत रुपांतर मे महिन्यात होईल. नवविवाहितांच्या घरी एखादी सुखद बातमी जानेवारी महिन्यानंतर कळेल. मार्च एप्रिल, मे मध्ये प्रकृतीला सांभाळून जबाबदार्‍या स्वीकाराव्यात. वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने जूनपर्यंत कालावधी चांगला आहे. नवीन व्यक्तींशी मैत्री झाल्यामुळे जीवनामध्ये बहार येईल. सिंह रास ही स्थिर गुणधर्माची, अग्नितत्वाची आहे. तिचा अधिपती रवी आहे व चिन्ह सिंह आहे. शुभरंभ पिवळा, शुभरत्न टोपाझ व अराध्य दैवत श्रीराम आहे.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

शनि साडेसाती चिंतन कथा

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

शुक्रवारी रात्री करा हा गुप्त उपाय, देवी लक्ष्मीच्या कृपेने पैशाची कमतरता भासणार नाही

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

सर्व पहा

नक्की वाचा

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

Show comments