Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 26 March 2025
webdunia

आज गोकुळात रंग खेळतो हरी

radha krishna holi
आज गोकुळात रंग खेळतो हरी
राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी
 
तो चटोर चित्तचोर वाट रोखतो
हात ओढूनी खुशाल रंग टाकतो
रंगवून, रंगूनी गुलाल टाकतो
सांगते अजूनही तुला परोपरी
 
सांग श्याम सुंदरास काय जाहले
रंग टाकल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्यास रंग रंग रंग लागले
एकटीच वाचशील काय तू तरी
 
त्या तिथे अनंगरंग रास रंगला
गोपगोपिकांसवे मुकुंद दंगला
तो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला
हाय वाजली फिरुन तीच बासरी
 
गीतकार :सुरेश भट
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :पं. हृदयनाथ मंगेशकर

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

National Wildlife Week:'राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह', जाणून घ्या संपूर्ण आठवडाभर साजरा होणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश