Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किती तरी दिवसांत

Webdunia
गुरूवार, 5 सप्टेंबर 2024 (12:19 IST)
किती तरी दिवसांत
नाही चांदण्यात गेलो
किती तरी दिवसांत
नाही नदीत डुंबलो
 
खुल्या चांदण्याची ओढ
आहे माझी ही जुनीच
आणि वाहत्या पाण्याची
शीळ ओळखीची तीच
 
केव्हा तरी चांदण्यात
पुन्हा जाईन निर्भय;
गांवाकाठच्या नदीत
होईन मी जलमय
 
आज अंतरात भीती
खुल्या चांदण्याची थोडी
आणि नदीचा प्रवाह
अंगावर काटा काढी
 
बरा म्हणून हा ईथे
दिवा पारवा पाऱ्याचा
बरी तोतऱ्या नळाची
शिरी धार, मुखी ऋचा
 
कवी- बा.सी.मर्ढेकर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र कहाणी : कोल्हा आणि जादूचा ढोल

तळहातावर वारंवार खाज येणे हे 5 आजार दर्शवतात

साबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

पोटाला थंडावा देते दुधीचे आरोग्यवर्धक ज्यूस

पुढील लेख
Show comments