Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उठा उठा चिऊताई

kids story sparrow
, शनिवार, 21 मे 2022 (12:56 IST)
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही
 
सोनेरी हे दुत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजनुही?
 
लगबग पांखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,
 
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या?
 
बाळाचे मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दुर जाई
भूर भूर, भूर भूर
 
Kusumagraj

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Monkeypox मंकीपॉक्स विषाणू म्हणजे काय, जाणून घ्या संसर्गाची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय