Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मूर्खाला उपदेश केला तर..

Webdunia
शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2014 (14:10 IST)
एकदा हिमालयाच्या भागात एक वानर पावसात सचैल भिजल्याने थंडीने कुडकुडत एका झाडाखाली बसला होता. त्याच झाडावर एका घरट्यात एक पक्षी राहात होता. कुडकुडणार्‍या वानराला बघून त्याने म्हटले, 'अरे, आम्ही केवळ चोचीने घरटे बांधतो. तुला तर माणसासारखे हात-पाय आहेत. डोके आहे. असे असताना राहायला घरकुल का बांधत नाही तू? बांधले असतेस तर उघड्यावर अशी कुडकुडत बसण्याची पाळी आली नसती तुझ्यावर.'
 
'माणसासारखे हात-पाय आहेत मला, पण..' वानर कुरकुरला, पण माणसासारखी कामगिरी आम्हाला कुठली जमायला? आमचे डोके तेवढे नाही काम करत.'
 
'त्याचे काय आहे..' पक्षी बोलला, 'ज्याचे मन चंचल असते, जो दुसर्‍याच्या कुचेष्टा करण्यात वेळ दवडतो, त्याच्या हातून विधायक स्वरूपाचे काम होत नाही. यासाठीच दुसर्‍याला त्रास देण्याची प्रवृत्ती तू सोडून द्यायला हवीस. मग जिद्दीने, चिकाटीने स्वत:च्या निवार्‍यासाठी घरकुल बांधता येईल तुला.'
 
उपदेश ऐकायची सवय नसलेल्या वानराला आला वैताग. तो चिडून, दात विचकत बोलला, 'घरट्यात बसून मारे उपदेश करायला काय जाते तुझे? तू समजतोस कोण स्वत:ला? थांब, माझा इंगाच दाखवतो तुला.'
 
आणि झरझर झाडावर चढून त्या वानराने पक्ष्याचे घरटेच विस्कटून टाकले. दुष्ट स्वभावाच्या मूर्खाला आपण उपदेश करीत बसलो, म्हणून हा प्रसंग आपल्यावर ओढवला. हे तो पक्षी जाणून चुकला आणि 'स्वत:चं घर करवत नाही अन् दुसर्‍याने बनवलेले बघवत नाही,' असे मनाशी म्हणत तो पक्षी दूर उडून गेला.

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखावे? आयुर्वेद निरोगी राहण्यासाठी हे 5 चिन्हे सांगते

शनि साडेसाती चिंतन कथा

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

Show comments