Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर-बिरबल कथा : बिरबलजींचे घर माहीत आहे का!

वेबदुनिया
WD
बिरबलाची राहणी एकदम सादी होती. फक्त दरबारात जाताना तो उंची कपडे वापरत असे. असेच एकदा तो साधे कपडे घालून आपल्या घराच्या फाटकातून बाहेर पडून रस्त्याला लागला असता त्याला एक इसम भेटला व त्याने बिरबलाला विचारले,
'' काय रे, तुला बिरबलजींचे घर माहीत आहे का?'' तेव्हा बिरबलाने घराकडे बोट दाखविले व तो तेथून निघून गेला. तो इसम बिरबलाच्या घरी गेला असता तेथील सेवकाने 'ते इतक्यातच बाहेर गेले आहेत, परंतु लवकरच परत येणार आहेत,' असे सांगून एका बैठकीवर बसण्यास सांगितले.

अगदी थोड्याच अवधीत बिरबल पुन्हा घरी आला आणि आपल्याला मघाशी रस्त्यात भेटलेला माणूस म्हणजेच बिरबलजी आहेत, हे समजताच तो इसम फारच ओशाळला व बिरबलला म्हणाला,
'' बिरबलजी, थोड्या वेळापूर्वी आपण मला रस्त्यात भेटलात, तेव्हा मी बिरबलजी कोठे राहतात, असा प्रश्न विचारला असता, आपणच बिरबल असल्याचे तेव्हा का बरे सांगितले नाहीत?''

यावर बिरबल म्हणाला, ''तुम्ही मला रस्त्यात भेटलात, तेव्हा मला अरे-तुरे असे संबोधू लागलात. तेव्हा मला वाटले, आपण कोणी तरी बडी आसामी आहात. आणि मग मी तर तुमच्यापुढे अगदीच मामुली ! म्हणून बड्या आसामीने विचारलेल्या प्रश्नाला अगदी मोजकेच उत्तर द्यायला नको का? त्याकरिता मी आपल्या प्रश्नाप्रमाणे उत्तर दिले.''

बिरबलने असा ठेवणीतला टोला मारल्याने त्या गर्विष्ठ माणसाचा नक्षा उतरला व त्याने बिरबलाची माफी मागितली.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments