Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हातारपणाची काठी : तात्पर्य कथा

Webdunia
गुरूवार, 3 सप्टेंबर 2015 (13:36 IST)
आई एकसारखी रडतच होती. बाबा अजून ड्युटीवरून परत आले नव्हते.
 
'सोनू बेटी, काय केलंस हे? मी भाजी आणायला बाजारात गेले होते आणि एका क्षणात कसं घडलं सगळं? आपल्या धाकट्या भावाला मोनूला वाचवण्याच्या नादात पोरी, तू स्वत:कडे लक्षच दिलं नाहीस. आम्ही तुला फुलासारखं वाढवलं. तुझी काळजी घेतली. तू तर आमच्या अंगणातली तुळस होतीस.. परमेश्‍वरा, तू आम्हाला कन्यादानाचं पुण्यही लाभू दिलं नाहीस.. काय केलंस तू असं? आणि का..?'
 
'आई, मोनू झोपला होता. अचानक खोलीत कशी आग लागली, कुणास ठाऊक? मोनूची किंचाळी ऐकून मी जेव्हा पळत तिकडे गेले, तेव्हा आग सगळ्या खोलीत पसरली होती. मी झटकन आत जाऊन मोनूला बाहेर ढकललं, पण ज्वाळांनी तोपर्यंत मला घेरलं. मी बाहेर येऊ शकले नाही. माझा आरडाओरडा, किंचाळणं ऐकून शेजारी धावून आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.. आई, तू नेहमीच म्हणतेच ना, मोनू आमची म्हातारपणाची काठी आहे. आमचा आधार आहे. मी तर एक मुलगी आहे, परक्याचे धन. एक ना एक दिवस मला तुमचा निरोप घ्यायचाच होता, पण आई, मोनूला काही झालं असतं, तर आपली म्हातारपणाची काठी, आपला आधार कोण झालं असतं?'
 
बोलता बोलता ती शांत झाली आणि ते निस्तब्ध वातावरण आईच्या किंकाळीने चिरत गेलं. 

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर नेपाळने बंदी घातली

घरात झोपले होते लोक, कॉलोनीमधील जनरेटरमध्ये लागली आग

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामानाची झडती

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

Show comments