rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अकबर-बिरबलची कहाणी : तीन प्रश्न

Kids story
, सोमवार, 7 एप्रिल 2025 (20:30 IST)
Kids story : एकदा अकबराने दरबारात बिरबलाचे खूप कौतुक केले. यावर सर्व दरबारी बिरबलावर रागावले.ते सर्वजण अकबराला म्हणाले, महाराज, तुम्ही बिरबलाची खूप स्तुती करता, पण बिरबल त्या स्तुतीला पात्र नाही. जर बिरबलने काही प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली तर मान्य करू की बिरबल सर्वात बुद्धिमान आहे. अकबरने मंत्र्यांना विचारले, तुमचे प्रश्न काय आहे? यावर आता मंत्र्यांनी बिरबलला तीन प्रश्न विचारले. त्यामधील पहिला प्रश्न असा होता की, आकाशात किती तारे आहे?,  दुसरा प्रश्न पृथ्वीचे केंद्र कुठे आहे?, तिसरा प्रश्न या जगात किती पुरुष आणि किती स्त्रिया आहे?
ALSO READ: लघु कथा : राणी मुंगीची शक्ती
आता अकबरने लगेच बिरबलला सांगितले की या तीन प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर दे नाहीतर तुला इथून कायमचे निघून जावे लागेल. पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी, बिरबल एक मेंढी घेऊन आला आणि म्हणाला की आकाशात मेंढीच्या शरीरावर जितके केस आहे तितके तारे आहे, आता जर मंत्र्यांना हवे असेल तर ते या मेंढीचे केस मोजू शकतात. दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात, बिरबलाने जमिनीवर काही रेषा काढल्या आणि एका ठिकाणी एक खुंटी लावल्यानंतर म्हणाला हा पृथ्वीचा मध्यभाग आहे आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर ते मोजा. तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात बिरबल म्हणाला महाराज, जगात किती पुरुष आणि किती स्त्रिया आहे हे शोधणे कठीण आहे कारण या मंत्र्यांनी हिशोब बिघडवला आहे. ते ना महिला आहे ना पुरूष, जर तुम्ही त्यांना मृत्यू दंड दिला तर योग्य हिशोब निघेल. आता हे ऐकून सर्व मंत्री घाबरले आणि दरबारातून निघून गेले. आता अकबराने पुन्हा एकदा बिरबलाच्या बुद्धिमत्तेचे कौतुक केले.
ALSO READ: प्रेरणादायी कथा : आचरण महत्वाचे की ज्ञान?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Natural Sunscreen for Summer: महागड्या सनस्क्रीनवर पैसे खर्च करण्यापेक्षा या गोष्टी वापरा, त्वचा उन्हापासून सुरक्षित राहील