suvichar

अकबर-बिरबल कथा : त्यात अशक्य काय आहे?

वेबदुनिया
बादशहा, दरबारी मंडळी आणि बिरबल असे सर्व लोक एकदा यमुनेचया वाळवंटात फिरायला गेले, तेव्हा सहज म्हणून बादशहाने यमुनेच्या स्वच्छ रेतीत हातातील काठीने एक रेषा काढली. नंतर बरोबरच्या मंडळीकडे पाहून तो म्हणाला, ''या रेषेला अगदी थोडाही स्पर्श न करता, आपणापैकी कोणी तिला लहान करून दाखवील का?''

बिरबल वगळता सर्वजण म्हणाले, '' खाविंद, ते कसे शक्य आहे?''

'' त्यात अशक्य काय आहे?'' असे म्हणून बिरबलाने बादशहाने आधी काढलेल्या रेषेजवळच तिला समांतर अशी तिच्यापेक्षा लांब रेषा काढली व मग बादशहाने काढलेल्या रेषेकडे त्याचे लक्ष वळवून बिरबल म्हणाला, ''खाविंद, पाहा बरे, मी काढलेल्या लांब रेषेमुळे तुमची रेषा एकदम लहान वाटू लागली का नाही? शिवाय तुमची अट पाळून.''
बिरबलाच्या या युकतीवर बादशहा एकदम खूष झाला.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

हे आहार किडनी स्टोनचा धोका वाढवतात, काळजी घ्या

Career in Executive PGDM Marketing: मार्केटिंगमध्ये एक्झिक्युटिव्ह पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट कोर्स करून करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

पन्नाशीत ही सुंदर दिसण्यासाठी या 3 मेकअप टिप्स अवलंबवा

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्यासाठी हे अप्रतिम फेस पॅक घरच्या घरी बनवा

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती डिश Hotel-like delicious Manchurian Rice Recipe

पुढील लेख
Show comments