Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

King And The Old Man Story : मराठी बोध कथा : राजा आणि वृद्ध माणूस

Webdunia
शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (21:30 IST)
एका नगरात एक राजा होता.तो फार प्रेमळ होता.तो नेहमी आपल्या प्रजेची काळजी घ्यायचा.तो अधून मधून आपल्या प्रजेवर लक्ष देण्यासाठी नगरभ्रमणासाठी निघायचा.हिवाळ्याचे दिवस होते.थंडीची लाट उसळली होती.तरी ही तो नेहमी प्रमाणे रात्रीच्या वेळी नगर भ्रमणासाठी निघाला.  
 
राजवाड्यात परत आल्यावर त्याने पाहिले की एक म्हातारा महालाच्या मुख्य दारा जवळ बसलेला आहे. पातळ धोतर आणि कुर्ता घातलेला म्हातारा थंडीने थरथर कापत होता. कडाक्याच्या थंडीत त्याच्या अंगावर काहीच कपडे नसलेल्या त्या  म्हताऱ्याला पाहून राजा आश्चर्यचकित झाला.
 
राजाने त्याच्या जवळ जाऊन विचारले, "बाबा आपल्याला थंडी जाणवत नाही का?"
 
"जाणवते. पण काय करावे? माझ्याकडे उबदार कपडे नाहीत. इतकी वर्षे, मी कोणत्याही उबदार कपड्यांशिवाय कडक थंडीत जगत आहे. देव मला इतकी शक्ती देतो की मी इतकी थंडी सहन करू शकतो आणि जगू शकतो. " म्हाताऱ्याने  उत्तर दिले.
 
राजा खूप दयाळू होता.त्याला म्हाताऱ्याची दया आली. त्याचा कंठ दाटून आला.तो म्हाताऱ्याला म्हणाला, "आपण इथेच थांबा. मी आत जाऊन आपल्यासाठी उबदार कपडे पाठवतो. "
 
म्हातारा खूश झाला. त्याने राजाचे अनेक आभार मानले.म्हाताऱ्याला आश्वासन दिल्यानंतर राजा राजवाड्याच्या आत गेला. पण राजवाड्याच्या आत गेल्यावर तो इतर कामात व्यस्त झाला आणि म्हाताऱ्याला उबदार कपडे पाठवायला विसरला.
 
दुसऱ्या दिवशी सकाळी एक शिपाई आला आणि त्याने राजाला कळवले की एक म्हातारा वाड्याच्या बाहेर मृत अवस्थेत पडलेला आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी जमिनीवर एक संदेश लिहिलेला आहे, जो त्याने  मृत्यूपूर्वी लिहिला होता.
 
तो संदेश असा काही होता: “इतकी वर्षे  पातळ धोतर-कुर्ता परिधान करून थंडीला सहन करून जगत होतो. पण काल ​​रात्री मला उबदार कपडे देण्याचा तुझ्या वचनाने माझा जीव घेतला "
 
शिकवण - दुसऱ्यांकडून केलेली अपेक्षा आपल्याला कमकुवत बनवतं,म्हणून कधीही इतरांकडून काहीही अपेक्षा करू नये.स्वतःला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहावे.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

पोटदुखीला हलके घेऊ नका, या 5 गंभीर समस्या होऊ शकतात

नात्यात या गोष्टींची विशेष काळजी घ्या

400 पर्यंत वाढलेली रक्तातील साखर लगेच डाऊन होईल, मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी हे 5 पदार्थ खावेत

खजुराचा हलवा रेसिपी

Children's Day 2024 Wishes In Marathi बालदिनाच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments