suvichar

पंचतंत्र : दोन तोंड असलेला पक्षी

Webdunia
गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (20:30 IST)
एका तलावाजवळ एक भारण्ड नावाचा एक विचित्र पक्षी राहायचा. ज्याला दोन तोंड होते. परंतु एक पोट होते. एकदा फिरतांना त्याला किनाऱ्यावर एक अमृतसमान गोड फळ मिळाले. ते फळ त्या पक्षाने उचलले आणि एक तोंड म्हणाले वाह हे फळ किती गोड आहे. आज पर्यंत मी अनेक फळे खाल्ली पण यासारखा स्वाद कधीही पाहिला नाही. 
 
तसेच दुसरे तोंड यापासून वंचित राहिले. तसेच ते पहिल्याला तोंडाला म्हणाले मला देखील याची चव चाखायला दे. पहिले तोंड म्हणाले तुला काय करायचे पोट तर एक आहे ना आपल्या पोटातच तर गेले. उरलेले फळ त्याने आपल्या प्रियसीला दिले. ते फळ खाऊन प्रियसी प्रसन्न झाली. त्यादिवसापासून दुसऱ्या तोंडाला भयंकर राग आला व बदला घेण्यासाठी तो विचार करू लागला. 
 
एक दिवस दुसऱ्या तोंडाला एक उपाय सुचला. त्याला एक विषारी फळ दिसले. पहिल्या तोंडाला दाखवत तो म्हणाला की, बघ मला हे विष फळ दिसले आहे आणि मी ते खाणार आहे. तसेच पहिले तोंड त्याला म्हणाले की, अरे असे करू नकोस तू हे खाल्लेस तर आपण दोघे ठार होऊ. पण दुसऱ्या तोंडाने त्याचे काहीही ऐकले नाही व ते  विष फळ काहून टाकले. परिणाम हा झाला की, दोन तोंड असलेला पक्षी शेवटी मरण पावला. 
 
तात्पर्य : नेहमी स्वतःसोबत दुसऱ्याचा देखील विचार करावा.  

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

६ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीप्रमाणे २०२६

Vegetable Upma Recipe सकाळी नाश्त्यासाठी उत्तम आरोग्यदायी रेसिपी

लाल केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात, जाणून घ्या

बायोटेक्नॉलॉजी एम.फिल कोर्स मध्ये करिअर करण्यासाठी पात्रता सर्व माहिती जाणून घ्या

Shiv Jayanti Wishes 2026 छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीप्रमाणे) शुभेच्छा संदेश

पुढील लेख
Show comments