एकदा राजा कृष्णदेवराय कारागृहाचे सर्वेक्षण करण्यासाठी निघाले. तिथे बंदी बनवलेल्या दोन चोरांनी राजाला दया करा म्हणून विनंती केली. तसेच चोर म्हणाले की, आम्ही चोरी करण्यात हुशार आहोत. आम्ही तुम्हाला इतर चोरांना पकडण्याकरिता नक्कीच मदत करू शकतो.
राजाचे मन दयाळू होते. राजाने त्या दोन चोरांना सोडा म्हणून असा आदेश दिला. पण राजाने एक अट ठेवली, राजा चोरांना म्हणाले की आम्ही तुम्हाला सोडत आहोत. व तुम्हाला गुप्तहेर म्हणून निवड आहोत. जर तुम्ही तेनालीरामच्या घरात किमती सामानाची चोरी करण्यात यशस्वी झालात तर. चोरांनी ही आवाहन स्वीकार केले.
त्याच रात्री ते दोघे चोर तेनालीरामच्या घराजवळ गेले आणि झाडांमध्ये लपून बसले. रात्री भोजन झाल्यानंतर तेनालीराम फिरण्याकरिता निघाले. तेव्हा त्यांना झाडांच्या मध्ये काहीतरी असल्याची चाहूल लागली. त्यांना जाणवले की इथे चोर लपून बसले आहे.
थोड्यावेळाने ते मध्ये गेले आणि पत्नीला म्हणाले की, आपले किमती सामान सांभाळून ठेव. कारण दोन चोर इथेच लपून बसलेले आहे. त्यांनी पत्नीला सांगितले की, दागिने आणि अलंकार एका पेटिट भारावून ठेव. चोरांनी तेनालीरामचा हा संवाद ऐकला.
काही वेळानंतर तेनालीराम ने ती पेटी आपल्या घरामागील विहिरीमध्ये फेकली. चोरांनी हे सर्व पाहिले. तेनालीराम घरामध्ये जाताच दोन्ही चोरांनी विहिरीजवळ जाऊन त्यामधील पाणी बाहेर काढू लागले. त्यांनी रात्रभर पाणी ओढले. पहाट झाली तरी देखील ते विहीरमधून पेटी बाहेर काढू शकले नाही. सकाळी तेनालीराम बाहेर आलेआणि चोरांना म्हणाले की, धन्यवाद तुम्ही रात्रभर माझ्या झाडांना पाणी दिले. दोन्ही चोरांना समजले की, तेनालीरामने त्यांना फसविले आहे. त्यांनी तेनालीरामची माफी मागितली.
तात्पर्य : चुकीच्या गोष्टी स्वीकारणे नेहमी टाळावे.