Festival Posters

अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट नाश्ता पोहे; मऊ आणि चवदार होण्यासाठी काही छोट्या टिप्स

वेबदुनिया फीचर टीम
मंगळवार, 5 मे 2026 (14:25 IST)
कांदे पोहे हा महाराष्ट्रातील घराघरांत बनवला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि चविष्ट नाश्ता आहे. पोहे मऊ आणि चवदार होण्यासाठी काही छोट्या टिप्स महत्त्वाच्या असतात. या टिप्स वापरून तुमचे पोहे नक्कीच चवदार आणि मऊ होतील!

योग्य पोह्यांची निवड  

पोहे बनवण्यासाठी नेहमी 'जाड पोहे' किंवा 'मध्यम पोहे' वापरावेत. पातळ (नायलॉन) पोह्यांचा चिवडा होतो, ते कांदे पोह्यांसाठी वापरू नयेत.

पोहे भिजवण्याची पद्धत

पोहे कधीही पाण्यात भिजत घालू नका. ते एका चाळणीत घेऊन स्वच्छ धुवावेत आणि लगेच पाणी निथळून घ्यावे. पोहे धुताना हलक्या हाताने धुवावेत जेणेकरून त्याचा लगदा होणार नाही.

मुरण्यासाठी वेळ द्या

पोहे धुतल्यानंतर ते १०-१५ मिनिटे चाळणीतच राहू द्या. यामुळे ते व्यवस्थित फुगतात आणि मोकळे होतात.

मीठ आणि साखरेचा वापर

पोहे कढईत टाकण्यापूर्वी, चाळणीत असतानाच त्यात मीठ, थोडी साखर आणि लिंबाचा रस मिसळावा. यामुळे प्रत्येक पोह्याला चव लागते.

वाफ काढणे महत्त्वाची

फोडणीत पोहे टाकून मिक्स केल्यानंतर, कढईवर २-३ मिनिटे झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढा. पोहे मऊ होण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे.

पाण्याचा हबका

जर पोहे कोरडे वाटत असतील, तर वाफ काढताना हातावर थोडे पाणी घेऊन त्याचा 'हबका' मारावा. यामुळे पोहे जास्त वेळ मऊ राहतात.

बटाट्याचा वापर

कांदा परतताना त्यात बटाट्याचे बारीक काप घातल्यास पोह्यांची चव अधिक वाढते. तसेच, शेंगदाणे फोडणीत आधी तळून घेतल्यास ते कुरकुरीत लागतात.

ओलं खोबरं आणि कोथिंबीर

पोहे तयार झाल्यावर वरून भरपूर कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातल्यास पोह्यांचा स्वाद हॉटेलसारखा लागतो.
ALSO READ: आलू पराठा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, पण तो हॉटेलसारखा चविष्ट होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: पावसाळा स्पेशल कुरकुरीत पोहे पकोडे रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

नैतिक कथा : छोटासा ससा

Ice Facial कडक ऊन आणि घामावरचा सर्वोत्तम उपाय, चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि त्वचा टवटवीत ठेवते

इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी: १० वी पास उमेदवारांसाठी ३५०० जागा, पगार २ लाख रुपये महिना

Achari Bhindi Recipe: पारंपरिक भारतीय मसाल्यांचा वापर करून आचारी भेंडी अशा प्रकारे बनवा

Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम

पुढील लेख
Show comments