Kitchen Tips: भारतीय घरांमध्ये स्वयंपाकघराला खूप महत्त्व आहे. तसेच प्रत्येक भारतीय स्त्रीला आपल्या घराचे स्वयंपाकघर नेहमीच चमचमीत ठेवायचे असते, परंतु स्वच्छ केल्यानंतर देखील स्वयंपाकघरातील भांडी चिकट राहतात. यामध्ये चहाच्या भांड्यांचा समावेश असून भारतीय घरांमध्ये चहा सर्वाधिक बनवला जातो. चहा वारंवार तयार केल्यामुळे भांड्याचा तळ जळतो. इतकेच नाही तर काही वेळा भांड्याच्या आत विचित्र घाण साचते, जी घासल्यानंतरही स्वच्छ होत नाही. याकरिता आज आपण पाहणार आहोत चहाचे भांडे सहज कसे स्वच्छ करावे तर जाणून घ्या या ट्रिक.
बेकिंग सोडा-
चहाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा देखील वापरू शकतात. यासाठी सर्वात आधी चहाच्या भांड्यात सोडा टाकावा आणि पाच मिनिटे असेच राहू द्यावे. आता ते डिशवॉशर आणि पाण्याने स्वच्छ करून घ्यावे. यामुळे चहाचे भांडे स्वच्छ होते.
लिंबू-
चहाच्या भांड्यात लिंबू चोळल्यास ते भांडे लवकर स्वच्छ होते. याकरिता अर्धा लिंबू कापून जळलेल्या भांड्यावर चोळावा. आता भांडे गरम पाणी घालून धुवावे ज्यामुळे फायदा होईल.
व्हिनेगर-
जळलेले चहाचे भांडे स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा आणि थोडा वेळ तसेच राहू द्या. यामुळे चहाचे भांडे काही वेळात स्वच्छ होती.
मीठ-
चहा बनवण्याच्या भांड्यात दोन चमचे मीठ घालावे. नंतर पॅनमध्ये पाणी भरावे व लिक्विड डिशवॉशर साबण टाकून हलके गरम करावे. आता तासभर असेच राहू द्यावे. यानंतर स्वच्छ धुवून घ्यावे. आता कापडाने चहाचे भांडे स्वच्छ करावे.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik