Dharma Sangrah

Home Tips: लवंगामुळे स्वयंपाकघरातील काम होईल सोपे

Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (16:23 IST)
किचन कॅबिनेट्समध्ये अनेक प्रकारचे मसाले असतात. जे खाण्यासोबत इतर गोष्टींमध्ये देखील कामास येतात. त्यातीलच एक लवंग. लवंगचा उपयोग महिला नेहमी भाजी किंवा डाळींची चव वाढवण्यासाठी करतात. तसेच लवंगचा तुम्ही इतर प्रकारे देखील उपयोग करू शकतात. तर चला जाणून घेऊन या लवंग आपल्याला कशी मदत करते.
 
किडे नष्ट होतात-
स्वयंपाक घरात नेहमी किडे किंवा झुरळ फिरतांना दिसतात. तसेच साखरेत देखील ओलाव्यामुळे मुंग्या लागतात. तसेच कणिक, तांदूळ यांमध्ये देखील किडे होतात. तर अश्यावेळेस साखरेत, चहा पावडरमध्ये, तांदूळ, कणिक यामध्ये लवंग टाकून ठेवावी.
 
फळांवरील माश्या दूर करते-
एका संत्रीवर अनेक साऱ्या लवंग लावून ठेवा. लवंग लावलेली ही संत्री फळांच्या टोपलीमध्ये ठेऊन द्यावी. लवंगाच्या वासाने माश्या फळांजवळ येणार नाही.
 
जेवणाची चव वाढवते-
आयस्क्रीम, डेजर्ट्स आणि कॉकटेल मध्ये लवंग सिरप वापरल्यास त्याची चव वाढते. तसेच साखरच पाक बनवतांना त्यामध्ये साखर आणि पाण्यासोबत लवंग देखील घालावी. ज्यामुळे साखरेच्या पाकाला चांगली चव येते.
 
किचन चमकवा-
किचनमधील ओटा स्वच्छ करण्यासाठी लवंगाचे तेल पाण्यात घालून त्याच्याने स्वच्छता करावी. यामुळे किचनमधील ओटा तर स्वच्छ होईलच त्यासोबत लवंगाच्या वासाने मुंग्या आणि किडे ओट्यावर येणार नाही. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

आलं-लसूण पेस्ट महिनाभर काय अगदी दोन महिने खराब होणार नाही; जाणून घ्या साठवणुकीच्या टिप्स

Mixer Cleaning Tips मिक्सर पुन्हा नव्यासारखा चमकवण्यासाठी काही सोप्या पद्धती

Shani Jayanti 2026 शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रिय विशेष नैवेद्य

'बोटं चाटून खातील' अशी चविष्ट मसाला गिलक्याची भाजी नक्की ट्राय करा

केसातील उवा काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

पुढील लेख
Show comments