Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

No Onion Garlic Gravy कांदा न घालता भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी वापरा या ट्रिक्स

No Onion Garlic Gravy कांदा न घालता भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी वापरा या ट्रिक्स
आज आम्ही तुमच्यासोबत अशा पद्धती शेअर करणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची ग्रेव्ही घट्ट करू शकाल. त्यामुळे तुमच्या जेवणाची चवही वाढेल. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया तुमची ग्रेव्ही कशी घट्ट करायची-
 
दही आणि ताजी मलईने घट्ट करा- दही आणि मलईने ग्रेव्ही कशी घट्ट करायची असा प्रश्न तुम्हाला पडत असेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही एक सोपी पद्धत आहे. यामुळे तुमची ग्रेव्ही जाड होईल. तुम्हाला फक्त 3 चमचे दही आणि 2 चमचे फ्रेश क्रीम मिक्स करायचे आहे आणि चांगले फेटून घ्यायचे आहे. यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून हळूहळू दही आणि मलई घालून दोन मिनिटे चांगले शिजवून घ्या. तुम्हाला दिसेल की तुमची भाजी मलईदार आणि घट्ट दिसेल.
 
काजूच्या पेस्टने ग्रेव्ही घट्ट करा- शाही पनीरमध्ये लोक अनेकदा ग्रेव्हीमध्ये काजूची पेस्ट घालतात. यामुळे चव दुप्पट होते आणि भाजीला चकचकीतपणा येतो. तुम्हालाही तुमची भाजी कांद्याशिवाय घट्ट करायची असेल, तर पहिल्या कढईत टोमॅटो शिजवल्यानंतर त्यात काजूची पेस्ट घाला. भाजीमध्ये चव वाढवायची असेल तर प्रथम काजू थोड्या तुपात भाजून त्याची पेस्ट तयार करून ग्रेव्हीमध्ये घालावी. तुमच्या भाजीची चवही चांगली असेल आणि प्रत्येकजण तुमच्या जेवणाचे कौतुक करताना थकणार नाही.

शेंगदाण्याचे कूट- अनेक स्नॅक्समध्ये शेंगदाणे घालते जातात त्यामुळे तुम्ही तुमची भाजी बनवताना हा प्रयोग करू शकता. होय त्यात थोडे भाजून कुटलेले शेंगदाण्याचे पीठ घातल्याने तुमची ग्रेव्ही चांगली घट्ट होईल. यासाठी प्रथम 2 चमचे मैदा घ्या आणि त्यातून द्रावण तयार करा. यानंतर भाजून तयार केलेलं शेंगदाण्याचं कूट चांगले मिसळा. आता तुम्हाला जी ग्रेव्ही बनवायची आहे त्यात हळूहळू टाका, नीट शिजवा. यामुळे तुमची ग्रेव्हीही घट्ट होईल.
 
याशिवाय बरेच लोक ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लोअरचा वापर करतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण करून पाहू शकता. यासोबतच लक्षात ठेवा की प्रथम तुमची ग्रेव्ही मंद आचेवर ठेवा, यामुळे अतिरिक्त पाणी कमी होईल आणि ग्रेव्ही सुधारेल. आधीच जास्त पाणी तुमच्या ग्रेव्हीची चव आणि रंग खराब करू शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yoga for Anxiety चिंतामुक्त व्हायचं असेल तर फक्त हे 2 योग करा