Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Kitchen Hacks:दूध नासल्यावर फेकू नका, या किचन हॅक्स वापरा, अन्नाची चव वाढेल

Kitchen Hacks:दूध नासल्यावर  फेकू नका, या किचन हॅक्स वापरा, अन्नाची चव वाढेल
, बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (12:03 IST)
जर दूध गरम करताना ते नासले तर बायकांच मूड बिघडतो. अनेक बायका खराब  म्हणून  बऱ्याच वेळाफेकून देतात. जर आपल्यासह असेच बरेचदा घडत असेल तर नासलेले दूध फेकून देण्याऐवजी स्वयंपाकघरातील काही हेक्स करून पहा. चला तर मग जाणून घेऊ या.  
 
बहुतेक स्त्रिया नासलेल्या दुधापासून पनीर बनवतात आणि उरलेले पाणी फेकून देतात. पण आपणास हे  माहीत आहे का नासलेल्या दुधाचे पाणी पौष्टिक घटकांनी परिपूर्ण आहे. नासलेल्या दुधाचा वापर करून, आपण केवळ आरोग्यच नव्हे तर चव देखील कशी वाढवू शकता ते जाणून घ्या. 
 
नासलेल्या  दुधातून खवा बनवा -
जर रात्री ठेवलेले दूध सकाळी गरम झाल्यावर नासले असेल तर ते फेकून देऊ नका पण त्यातून खवा बनवा. खवा बनवण्यासाठी, नासलेले  दूध एका भांड्यात गरम करून घ्या, जोपर्यंत त्याचे पाणी आटत नाही. जेव्हा पूर्णपणे पाणी आटल्यावर   त्यात साखर घाला आणि थोडा वेळ शिजवा. आपला  खवा तयार आहे. 
 
नासलेल्या दुधापासून बर्फी बनवा- नासलेल्या दुधापासून खवा बनवून त्यात ड्रायफ्रूट्स टाकून बर्फीच्या आकारात कापून घ्या. त्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. अर्ध्या तासानंतर  टेस्टी बर्फी तयार आहे. जेवल्यानंतर बर्फी खाण्याचा  आनंद घ्या.
 
भाजीची  ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी- भाजीची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी देखील आपण नासलेले दूध वापरू शकता. यासाठी तुम्हाला शिजवलेल्या भाजीमध्ये शेवटच्या क्षणी नसलेले दूध टाकून त्याला शिजवायचे आहे.असं  केल्याने भाजीची ग्रेव्ही घट्ट आणि चवदार आणि पौष्टिक होईल.
 
कणिक मळण्यासाठी-  नासलेल्या दुधाने कणिक मळून घेऊ शकता..या कणकेपासून बनणाऱ्या पोळ्या खूप मऊ राहतील.
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वीरभद्रासन योग Virabhadrasana Yoga