Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

kitchen Hacks : किचन सिंक स्वच्छ करण्यासाठी कास्टिक सोडाचा असा वापर करा

Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (21:03 IST)
kitchen Hack: प्रत्येक घरात किचन सिंकचा वापर रोज होतो. काही वेळा उरलेले अन्न त्यात अडकते.सिंक मध्ये पाणी तुंबते. आणि पाण्याचा प्रवाह मंदावतो. पाणी साचल्याने किचन मध्ये दुर्गंध पसरू लागतो. 
सिंक संबंधित समस्या दूर करण्यासाठी काही सोपे उपाय अवलंबवू शकतो.  हे उपाय वापरून पाहिल्यास स्वयंपाकघरातील सिंक चमकेल आणि त्यात साचलेली घाणही स्वच्छ  होईल.चला तर मग जाणून घेऊ या कोणते आहे हे उपाय.  
 
स्वयंपाकघरातील सिंक चमकण्यासाठी तुम्ही कॉस्टिक सोडा वापरू शकता. अनेक वेळा स्वयंपाकघरातील सिंकचा नळ खराब झाल्याने त्यातून पाण्याचा छोटा प्रवाह सतत बाहेर पडत असतो. त्यामुळे सिंकमध्ये शेवाळ जमा होऊ लागते. सततच्या पाण्याच्या प्रवाहामुळे ड्रेन पाईपमध्ये शेवाळ शिवाय इतर घाण साचते. अशा परिस्थितीत, आपण कॉस्टिक सोडाच्या मदतीने ते स्वच्छ करू शकता.
 
कॉस्टिक सोड्याने स्वयंपाकघरातील सिंक साफ करण्यासाठी, प्रथम हातमोजे घाला.
यानंतर एका भांड्यात कॉस्टिक सोडा, बेकिंग सोडा, व्हिनेगर आणि लिक्विड डिश वॉश टाका आणि चांगले मिसळा. 
त्यानंतर स्क्रबरच्या साहाय्याने सिंकभोवती लावा. 
हे द्रव सिंकमध्ये लावल्यानंतर, ते 30 मिनिटे बसू द्या. 
आता स्टील स्क्रबर आणि ब्रशच्या मदतीने सिंक स्क्रब करायला सुरुवात करा. 
हळूहळू किचन सिंकमध्ये साचलेली सर्व घाण साफ केली जाईल. 
 
हे देखील वापरून बघा-
एका वाडग्यात कॉस्टिक सोडा आणि बाथरूम क्लीनर मिक्स करा. 
हे मिश्रण स्क्रबरच्या मदतीने किचन सिंकवर 20 मिनिटे लावा. 
नंतर वेळ झाल्यावर सिंक स्क्रबरने घासून घ्या. 
यासोबतच सिंकची घा दूर करण्यासाठी सिंकमध्ये दोन वाट्या कॉस्टिक सोडा टाका. 
आता वर थंड पाणी शिंपडा आणि 30 मिनिटे सोडा. 
नंतर पुन्हा पाणी घाला आणि सिंक पूर्णपणे धुवा.
या सोप्या पद्धतीने सिंकशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.

Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

पुढील लेख
Show comments