Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काही सोप्या किचन टिप्स

काही सोप्या किचन टिप्स
, बुधवार, 6 जानेवारी 2021 (13:13 IST)
* ग्रेव्हीला घट्ट करण्यासाठी या मध्ये सातूचे पीठ मिळवा. असं केल्याने ग्रेव्ही घट्ट होईल आणि चव देखील वाढेल.
 
* बटाट्याचे पराठे करताना बटाट्याच्या सारणात थोडी कसुरी मेथी घाला. या मुळे पराठे चविष्ट बनतील आणि खाण्यासाठी रुचकर होतील.
 
* राजमा किंवा उडदाचे वरण करताना पाण्यात उकळताना मीठ घालू नका, डाळ लवकर शिजेल. मीठ डाळ शिजल्यावर घाला.
 
* फ्लॉवरला शिजवल्यावर त्याचा रंग जातो. असे होऊ नये या साठी फ्लॉवरची भाजी करताना भाजीमध्ये एक चमचा दूध किंवा व्हिनेगर घाला.
 
* भेंडी चिरताना सुरीवर लिंबाचा रस लावा या मुळे भेंडीचे तार सुटत नाही.
 
* हिरव्या मिरचीचे देठ कापून फ्रीज मध्ये ठेवल्याने हिरव्या मिरच्या लवकर खराब होत नाही.
 
* रायता मध्ये हिंग आणि जिरेपूड घालण्या ऐवजी हिंग-जिऱ्याची फोडणी दिली तर रायता अधिक चविष्ट बनेल.
 
* पराठे चविष्ट बनविण्यासाठी कणकेत उकडलेले बटाटे किसून घाला.
 
* भजे करताना त्याच्या घोळात चिमूटभर आरारूट आणि गरम तेल घाला  भजे अधिक खमंग आणि चविष्ट बनतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आपल्या हृदयाला निरोगी ठेवतात या 6 आरोग्यदायक सवयी