किचन किंवा स्वयंपाकघराला स्वच्छ ठेवणे हे आव्हानात्मकच आहे. स्वयंपाकघराच्या कट्ट्यावर तेलाचे डाग पाडतात. त्या शिवाय शेल्फवर सिंक मध्ये डाग पडतात याची स्वच्छता कशी करावी या साठी काही टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या.
1 गरम पाण्यात सोडा आणि साबणाचा घोळ बनवून सिंक स्वच्छ करा.
2 स्वयंपाकघराच्या ओट्यावर साचलेली घाण काढण्यासाठी कोमट पाण्यात बेकिंग सोडा घालून 10 मिनिटे तसेच ठेवा नंतर स्क्रबरने स्वच्छ करा.
3 सिंक मध्ये बेकिंग सोडा घालून 3 -4 मिनिटे ठेवा,नंतर स्पॉन्जने घासून स्वच्छ करा. या मुळे सिंक वर साचलेली घाण आणि डाग नाहीसे होतात.
4 चिंचेच्या पाण्यात मीठ घालून सिंक स्वच्छ केल्याने साचलेली घाण स्वच्छ होते.
5 पाण्यात शॅम्पू मिसळून त्या पाण्यात स्पॉंज भिजवून किचनची चिमणी, एग्ज़ॉस्टफॅन आणि स्विचबोर्ड स्वच्छ करा.
6 चिमणीवर लागलेली घाण स्वच्छ करण्यासाठी चिंचेचं पाणी वापरा.
7 काचेच्या भांडीवरील डाग स्वच्छ करण्यासाठी मिठाच्या पाण्याने स्वच्छ करा.
8 प्लॅस्टिकच्या डब्यांवरील डाग स्वच्छ करण्यासाठी डब्यावर लिंबू घासावे.
9 किचनच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी कपड्यावर टूथपेस्ट लावून स्वच्छ करा.
10 गंजलेली ग्रील स्वच्छ करण्यासाठी त्यावर लिंबाचा रस लावून स्वच्छ केल्याने ग्रील चमकेल.