Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सुप्रिया सुळे यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (08:53 IST)
परमबीर सिंग यांच्या लेटर बाॅम्बमुळे गृहमंत्र्यांसहीत ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठत आहे.  त्यानंतर सरकारमधील मंत्री आणि नेते आता खडबडून जागे झालेले दिसून येत आहेत. या सर्व प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या गोटात वेगवान हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. त्याच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
 
आपण सोनिया गांधी यांची भेट घेतली असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत दिली आहे. तुमच्यासाेबत चर्चा करणं हे नेहमीच आनंददायी असतं. तुमच्या बहुमुल्य मार्गदर्शनासाठी खुप खुप आभारी आहे, असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे- चिनाब मैत्रीपर्वाला सुरुवात; चिनाब खोऱ्याला महाराष्ट्राशी जोडण्यासाठी सरहदचे प्रयत्न