Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार

आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार
, गुरूवार, 25 मार्च 2021 (22:03 IST)
प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली
या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनामुळे होळी, धुलिवंदन उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई