Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रशासनाचा दणका १४ दुकाने केली सील !

प्रशासनाचा दणका १४ दुकाने केली सील !
, गुरूवार, 25 मार्च 2021 (21:15 IST)
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले असून, जे व्यावसाईक कोरोनाचे नियम पाळणार नाहीत.
आपल्या दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत, अशा दुकानांवर कारवाई करण्यात येणार असून, ती दुकाने सात दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा यापूर्वीच इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हे नियम पायदळी तुडवल्याने जामखेड शहरातील तब्बल १४ दुकाने प्रशासनाने सील केली आहेत. अशी कारवाई निरंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
 
यात समृध्दी दूध, अंदुरे ब्रदर्स, अरिहंत गोळी सेंटर, घाडगे एजन्सी, स्वयंभुराज किराणा, महाराष्ट्र चायनीज सेंटर, शिवशंकर इलेक्ट्रॉनिक, रविंद्र कलेक्शन, त्रिमूर्ती भेळ सेंटर, इंदोर कलेक्शन, समृध्दी पेढेवाले, महाराष्ट्र शु सेंटर, मुंबई मोबाईल शॉपी अशी १४ दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसे नेते आमदार राजू पाटील यांना कोरोना