राज्यात अनेक ठिकाणी या पार्श्वभूमीवर निर्बंधही अधिक कडक करण्यात आले आहेत. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेन आणि लॉकडाऊनबाबत मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
"सध्या लॉकडाऊनचं कोणतंही वृत्त आमच्या चर्चेत नाही. आमचं लक्ष हे सध्या तीन गोष्टींवर आहे. चाचण्या वाढवणं, पायाभूत सुविधा वाढवणं आणि लसीकरणाचा वेग वाढवणं यावर आम्ही लक्ष देत आहोत. निश्चितच यात आम्हाला यश मिळेल," असा विश्वास काकाणी यांनी व्यक्त केला. "रेल्वे स्थानकांवर आम्ही पथक तयार केली आहेत. बाहेरून येणाऱ्या ज्या ट्रेन आहेत त्यासाठी आम्ही ही पथकं नेमली आहे. लोकल ट्रेन सध्या ज्या क्षमतेनं सुरू आहेत ती कायम राहिल हा आमचा प्रयत्न आहे. ती कमी करण्यावर आमचा कोणताही विचार नाही. परंतु शासकीय कार्यलयं, निमशासकीय कार्यालयं, खासगी कार्यालयांत ५० टक्के उपस्थितीत असावी. सर्वांनी या नियमाचं पालनं करावं, जेणेकरून लोकलमध्ये होणारी गर्दी काही प्रमाणात कमी होईल," असंही ते म्हणाले.