Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गूळ अधिक काळ साठवणे सोपे, रंग आणि चव तशीच टिकून राहील

गूळ अधिक काळ साठवणे सोपे, रंग आणि चव तशीच टिकून राहील
, सोमवार, 7 डिसेंबर 2020 (13:10 IST)
हिवाळ्याच्या हंगामांत अनेक खाद्य पदार्थ बाजारपेठेत दिसू लागतात. या दिवसात बाजारपेठेत नवीन गूळ येतो आणि बरेच लोक या दिवसात गूळ देखील आहारात घेतात. कारण हे शरीरास उष्ण ठेवत आणि आरोग्याशी निगडित इतर फायदे देखील या मुळे मिळतात. तसेच गुळापासून वेग वेगळे प्रकाराचे पदार्थ बनवतात.तसे तर गूळ हिवाळ्यात येतो. पण हे बाजारपेठेत 12 महिने मिळतो. बऱ्याचशा घरात गूळ साठवून ठेवला जातो. जेणे करून वर्षभर याचा आनंद घेता येऊ शकतो. पण बऱ्याच लोकांची तक्रार असते की गूळ लवकर खराब होतो आणि वर्षभर काय काही महिन्यातच याचा रंग आणि चव बिघडते. आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण गुळाला चांगल्या प्रकारे साठवून ठेवले तर आपला गूळ कधीही खराब होणार नाही. एवढेच नव्हे तर आपण सहजपणे गुळाला 1ते 2 वर्ष ठेवू शकता आणि ते देखील त्याचे रंग आणि चव खराब न होता.  

चला तर मग आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की गुळाला बऱ्याच काळ कसे साठवून ठेवू शकता.-
 
1 झिप लॉक बॅग मध्ये गूळ ठेवा-
आपल्याला गुळाला किमान 1 ते 2 वर्षे साठवून ठेवायचे असल्यास आणि त्याचा रंग आणि चव तशीच टिकवून ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावयाची असते. 
 
गुळाला साठवताना हे लक्षात घ्या की त्यामध्ये वारं लागता कामा नये. या साठी आपण प्रथम गुळाला पेपर टॉवेलमध्ये चांगल्या प्रकारे गुंडाळून ठेवावं. नंतर या गुळाला झिप लॉक असलेल्या बॅगेत ठेवावं. आपण झिपलॉक बॅगेतून प्रथम संपूर्ण हवा काढून घ्यावी. या नंतर बॅग बंद करा. आपण या गुळाला साधारण प्लॅस्टिकच्या पिशवीत देखील ठेवू शकता. नंतर हा गूळ एखाद्या हवा बंद डब्यात ठेवा. अशा प्रकारे साठवलेला गूळ वर्षोनुवर्षे खराब होत नाही.
 
2 कोरड्या पानांत ठेवा-
कोरड्या पानांपासून बनविलेले द्रोण आपल्याला सहजच बाजारपेठेत आढळतील. या मध्ये देखील आपण गुळाला साठवून ठेवू शकता. या साठी एक स्टीलचा डबा घ्या आणि त्यामध्ये हे कोरड्या पानाचे द्रोण ठेवा नंतर गुळाला डब्यात ठेवा आणि वरून गुळाला द्रोणाने झाकून द्या. असं केल्यावर आपण डबा बंद करून द्या. जर का आपण या प्रकारे गुळाला साठवता तर आपल्याला आढळेल की गूळ 4 ते 5 महिने खराब होणार नाही.
 
3 फ्रिज मध्ये साठवून ठेवा -
फ्रिज मध्ये देखील गूळ ठेवता येऊ शकतो. पण या साठी आपल्याला योग्य मार्ग माहित असावे. आपण सामान्य प्लास्टिक च्या डब्यात गुळाला साठवून ठेवलं तर हे लवकरच खराब होणार. तर आपण स्टीलच्या हवाबंद डब्यात ठेवून हा डबा फ्रिजमध्ये ठेवल्यावर काही महिन्यासाठी आपल्या गुळाचा रंग काळा होणार नाही आणि चव देखील खराब होणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अकबर बिरबल यांची मजेशीर गोष्ट : हिरवा घोडा