Festival Posters

Recipe Tips : पराठे लाटताना फाटणार नाही या साठी या टिप्स अवलंबवा

Webdunia
बुधवार, 14 डिसेंबर 2022 (22:45 IST)
हिवाळ्यात पराठे खाण्याची मजाच वेगळी असते. बटाटा, मुळा, पनीर, मटार, कोबी यांनी भरलेल्या पराठ्यांची मेजवानी या दिवसात असते. ज्याची चव जवळपास सगळ्यांनाच आवडते. पण भरलेले पराठे बनवणे इतकं सोपं नाही. स्त्रिया अनेकदा तक्रार करतात की पराठे भरताना किंवा लाटताना फाटतात. त्यामुळे सर्व साहित्य बाहेर येते.असं होऊ नये या साठी पराठे बनवताना या छोट्या टिप्स फॉलो करा. ज्याच्या मदतीने तुमचा एकही पराठा फाटणार नाही. चला तर मग जाणून घ्या.
 
1 कणिक मळताना काळजी घ्या
भरलेले पराठे बनवताना मळलेली कणिक परफेक्ट असावी . कणिक खूप मऊही नाही आणि खूप घट्ट ही नको. अर्धा वाटी मैद्याचे चे पीठ एक कप गव्हाच्या पिठात मिसळल्यास चांगली मळलेली कणिक  मिळते. तसेच या कणकेत तेल किंवा तूप आणि एक चतुर्थांश चमचे मीठ घाला. कोमट पाण्याच्या मदतीने कणिक मळून घ्या आणि सुमारे 15 मिनिटे ठेवा. 
 
2 सारण परिपूर्ण बनवा-
बटाटा किंवा मटारचे सारण तयार करताना लक्षात ठेवा की  भाजीचे पाणी उकळल्यानंतर चांगले गाळून घेतले आहे भाजीमध्ये पाणी उरले असेल तर मॅश करण्यापूर्वी पॅनमध्ये ठेवा आणि हलके परतून घ्या. जेणेकरून सर्व ओलावा निघून जाईल. नंतर भाज्या मॅश करा.
 
3 तापमान योग्य असावे -
पराठे फुटू नयेत असे वाटत असेल तर सारण भरताना तापमानाची काळजी घ्या. स्टफिंग खोलीच्या तापमानापेक्षा कधीही थंड किंवा गरम नसावे. नाहीतर लाटताना पराठे फाटतील. 
तसेच सारण भरताना कणकेच्या पुरी प्रमाणे सारण ठेवा. पराठा जास्त भरला तरी फुटतो. त्यामुळे स्टफिंग फक्त एका बॉलच्या प्रमाणात भरा. अशा पद्धतीने सारण भरल्यास पराठे लाटताना फाटणार नाही. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

जोडीदारासमोर पादणे हे खर्‍या रिलेशनशिपची लक्षण आहेत का?

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

सरकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू, पात्रता जाणून घ्या

कच्च्या दुधाचा फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणेल, असे वापरा

पुढील लेख
Show comments