Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोमॅटो दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या ट्रिक अवलंबवा

tomatoes
, शनिवार, 14 डिसेंबर 2024 (15:58 IST)
Kitchen Tips: टोमॅटो ही अशी भाजी आहे जी प्रत्येक घरात वापरली जाते. आपण टोमॅटो सलाड, सूप, चटणी, करी असे अनेक पदार्थामध्ये वापरतो. तसेच टोमॅटो ही लवकर खराब होणारी भाजी आहे. जर याला योग्य पद्धतीने स्टोर केले नाही तर हे लवकर खराब होतात. याकरिता आज आपण काही ट्रिक पाहणार आहोत ज्या अवलंबवल्याने टोमटो दीर्घकाळ ताजे राहतील. तर चला जाणून घ्या. 
 
योग्य तापमानात ठेवा-
टोमॅटो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यांची चव खराब होऊ ते देखील खराब होतात. टोमॅटो नेहमी खोलीच्या तपमानावर ठेवावे.जर हवामान गरम असेल तर आपण त्यांना थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवू शकता. टोमॅटो थंड ठिकाणी ठेवल्याने त्यांचा ताजेपणा कायम राहतो आणि ते लवकर खराब देखील होत नाहीत.
   
पेपरमध्ये गुंडाळावे- 
पेपरमध्ये टोमॅटो गुंडाळल्याने ओलावा शोषला जातो, ज्यामुळे ते कुजण्याची आणि खराब होण्याची शक्यता कमी होते. पेपर जास्त ओलावा शोषून घेतात आणि टोमॅटो ताजे ठेवतात.
 
पिकलेले आणि कच्चे टोमॅटो वेगळे करावे-
पिकलेले आणि कच्चे टोमॅटो एकत्र ठेवल्यास ते लवकर खराब होतात. हे दोन्ही वेगळे ठेवावे. जेणेकरून दोन्ही ताजे राहतील. पिकलेले टोमॅटो लवकर वापरावे व कच्चे टोमॅटो खोलीच्या तपमानावर ठेवा जेणेकरून ते पिकू शकतील.
 
टोमॅटो एकमेकांवर वर ठेवू नये-
टोमॅटो कधीही एकमेकांवर ठेवू नये. एकमेकांवर दबाव पडल्याने टोमॅटो लवकर खराब होतात. टोमॅटो नेहमी सपाट आणि एकमेकांपासून दूर ठेवा. 
 
पाण्यापासून दूर ठेवा-
टोमॅटो पाण्यात भिजवणे टाळावे. टोमॅटो पाण्यात भिजवल्याने ते लवकर कुजतात आणि त्यांची चवही बिघडते. टोमॅटो नेहमी कोरडे ठेवा. जेव्हा तुम्ही टोमॅटो धुता तेव्हा ते पूर्णपणे वाळवा जेणेकरून पाण्याने ते खराब होणार नाही.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रोटीन पावडर आरोग्यासाठी घातक ठरू शकते, सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या