Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नातं पत्रातलं....

डॉ. राजेंद्र माने

Webdunia
WD
' तू रोझ डे' ला पिवळा गुलाब दिलास. मैत्रीचं प्रतिक म्हणून.. खरं सांगू! तो घेताना माझे हात थरथरत होते. त्या मानानं माझ्या मैत्रीणी खूप धीट.. मुलांना त्या 'हाय हॅलो' करतात. कधी शेकहॅंड सुध्दा करतात मला त्यांच कौतुक वाटतं... मलाही ते आवडतं रे! पण....

कॉलेजच्या पहिल्या दिवशी मला ऑफिस माहित नव्हतं तेव्हा शोधत इकडं तिकडं तरंगत होते. 'तू काय शोधतेस' आवाज तू दिलास. मला आपुलकिनं ऑफिसही दाखवलसं... पण, मी किती वेंधळी तुला थॅक्सही म्हटलं नाही.. खरं सांगू.. म्हणायचं मनातं आलं होतं पण, धाडस झालं नाही. तशी मी मुळातच कमी बोलणारी. मायी आजी नेहमी म्हणायची 'पूजा तुझं कसं होणारं? सगळ जग बोलण्याच्या भांडवलावर चालते आणी तु समोर ताट आली तरी कोणी 'खा' म्हणेपर्यंत खाणार नाहीस.

अमित... माझी आजी जुन्या काळातली.. काठापदराची नऊवारी नेसणारी. अजूनही आमच्या घरात सणवार जुन्या पध्दतीने साजरे होतात. अशा घरात मी वाढलेली. मला काय म्हणायचेय ते समजलं ना...?

त्या पहिल्या भेटीतला तुझा रेड कलरचा टी-शर्ट मला खूप आवडला होता... त्यावर गोल्डन कलरमध्ये लिहले होते ' you Want friend' ते ही मला खूप आवडलेलं. आणि मग जेव्हा तू मला काल पिवळा गुलाब दिलास तेव्हा मला तेच सगळं आठवलं. खरं सांगायच तर मला तुझी मैत्रीची भाषा आवडली. मला दोन-तीन मैत्रिणी आहेत. पण, आजवच्या आयुष्यातला पहिला मित्र तूच.. 'अमित'

WD
आणखी एक सांगू... तू छान दिसतोस. माझी मैत्रिण निशा म्हटते तू आपल्या कॉलेजच्या 'शाहिद कपूर' आहेस म्हणून. आणि तिनं तसं म्हटल्यापासून खरचं मला तुझ्यात आणि त्याच्यात काही गोष्टी सेम भासायला लागल्या आहेत... आई शप्पथऽऽऽऽ

निशा आणि मी दोघींनी कॉलेजचा पिरियड बंक करून पर्वा 'जब वुई मेट' पाहिला. ग्रेट आहे ना पिक्चर! शाहिद तर किती गोड दिसलाय आणि त्यात तू मला मैत्रिण बनविल्यापासून खरं सांगायचं झालं तर मी थोडी हवेतच आहे. (निशाच असं म्हणाली)

मी तूला एकदम पत्र लिहायला बसलेय... कदाचि‍त हे जरा जास्तच होत नाही नां. निशाला मी हे सांगितलं नाही. ती म्हणजे जरा 'पीळ' आहे. ऊगाच काहीच्या काही सबंध जोडेल. पण, या वयात 'मित्र' मिळाला ही जरा मस्तच वाटतं.

त्या दिवशी आईनं ते पिवळं फूल पाहून विचारलं 'पूजेऽऽऽ' हे कुठून आणलसं... तिला मित्रानं किंवा कॉलेजमधल्या मुलानं दिलं म्हणून सांगितल असतं तर प्रश्नांची सरबत्ती चालू झाली असती. 'कोण तो..', 'नाव काय..', 'मवाली नाही ना..','आई-वडील कुठं असतात' आणि शेवटी 'कोणत्या जातीचा..' वगैरे वगैरे...

आई माझी जरा जास्तच काळजी घेते. तिला तसं म्हटलं तर म्हणते 'आई झालीस की कळेल..' असेलही...

WD
पण, खरी एक गंमत सांगू. आईला 'अमित' नाव आवडतं. तिला अमिताभ बच्चन जाम आवडतो. त्याचे पिक्चर अगदी इनव्हॉल्व होऊन बघत असते. तिच्या कॉलेजच्या वेळी तो जाम फेमस असणार. त्यामुळं तुझं नाव तिला नक्की आवडेल...

परवा डॉली काय म्हणाली माहित आहे? ती मला म्हणाली... 'माझी मैत्री स्विकारशील' असं सांगून मुलं प्रेमाची सुरूवात करतात आणि मुली प्रेमाचा शेवट ' तू फक्त माझा चांगला मित्र आहेस' म्हणून करतात. डॉली असं विचित्र पण, मार्मिक बोलतं असते.

असो.. अच्छा तर मी आता रजा घेते. माझ्या पत्राचं उत्तर पत्रानच दिलसं तर मला आवडेल. आता हे पत्र तुला कसं पोहोचवायचं याचा विचार मी करत आहे. निशाल कळलं तर जाम पीळ देईल.

पूजा...

( क्रमश:)

लेखक साता-यातील साहित्यीक आहेत.

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

केस निरोगी ठेवण्यासाठी ताकासोबत चिया सीड्स चे सेवन करा हे फायदे मिळतील

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीसाठी तुपात मिसळून हे खा, आजार दूर राहतील

तुम्ही लिव्ह रिलेशनमध्ये असाल तर या 10 गोष्टी लक्षात ठेवा

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

Show comments