Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तव नयनांचे दल हलले गं

Webdunia
ND
तव नयनांचे दल हलले गं
पानावरच्या दवबिंदूपरी
जग सारे डळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

तु्झ्या नुस्त्या डोळ्यातली ताकद काय सांगू. पानावरच्या नाजूकशा दवबिंदूत सारे जग सामावलेलं असतं. तुझ्या पापण्या नुसत्या हलल्या काय नि हे त्रिभूवन अवघं डळमळलं. तुझ्या धनुष्याकृती नयनांत अवघं जग हलवून टाकण्याची ताकद आहे. तिथे माझ्या ह्रदयाची काय कथा.

वारे गळले तारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषी मुनी योगी चळले गं
तव नयनांचे दल हलले गं

तिच्या डोळ्यांच्या पापण्या हलल्या नि त्रिभूवन डळमळलं. वारे हलायला लागले. तारे जागेवरून कोसळले. या मूर्त जगातल्या सगळ्या भौतिक गोष्टी पंचतत्वांसारख्या जागेवरून हलल्या. पर्वत ढासळले, गायकांचे सूरही कोसळले. एवढंच काय तुझ्या त्या हललेल्या पापणीने बडे बडे ऋषी-मुनीही घायाळ झाले. तुझ्या पापणीत या सगळ्यांना चळवण्याची ताकद आहे तिथे माझ्या ह्रदयाची काय कथा.

ऋतुचक्राचे आस उडाले
आकाशातुन शब्द उडाले
आवर आवर अपुले भाले
मीन जळी तळमळले गं
तव नयनांचे दल हलले गं

तुझ्या पापण्या हलल्या नि ऋतुचक्रही बिघडले. त्यांचे आसच गायब झाले नि ऋतूत ऋतू मिसळून गेले. आकाशातले शब्दही उडून गेले. तुझ्या नयनांचे हे भाले आता तू आवर गं. तुझ्या या जीवघेण्या नजरेने पाण्यातले मासेही तळमळून गेले बघ. तुझ्या पापणीत हे सारे घडविण्याची क्षमता असताना माझ्यासारख्याच्या ह्रदयाची काय कथा.

ह्रुदयी माझ्या चकमक झडली
दो नयनांची किमया घडली
नजर तुझी धरणीला भिडली
पुनरपी जग सावरले गं
तव नयनांचे दल हलले गं

आपल्या उभयतांचे डोळे परस्परां भिडले नि माझ्या ह्रदयात जणू चकमक घडली. माझ्या नजरेला बद्ध करून तुझी नजर जमिनीला भिडली. साऱ्या त्रिभूवनाला डळमळवणारी तुझी नजर अखेर माझ्यावरून धरणीवर स्थिरावली आणि तुझ्या या आश्वासक आधाराने पुन्हा एकदा त्रिभूवन सावरलं. तु्झ्या पापणीने सारं जग हलवलं होतं, तिथे माझ्या ह्रदयाची काय कथा.

( बा. भ. बोरकराच्या कवितेचे रसग्रहण)
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

Show comments