Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

समस्या 'टीनएजर्स'च्या !

Webdunia
टीनएजर्स अर्थात किशोरावस्था. याच अवस्थेत मुलं स्वप्नांचे पंख लावून उडू लागतात पण खाली पडण्याची भीतीसुद्धा मनात असते. या वेळेस पालकांची जबाबदारी असते ती मुलांच्या समस्यां समजून त्या सोडविणे. त्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 

चोरी/अपरा
तुमच्या मुलाने खोटं बोलणे सुरू केले आहे का? त्याने नवीन मित्र बनवून जुन्या मित्रांची साथ सोडली आहे का? शाळेतील स्पर्धांत
भाग घेणे बंद केले आहे काय किंवा भाग न घेण्याची कारणे शोधतो काय? बोलण्यात काही नवीन व नको ते शब्द येतात काय? शिव्या देतो काय? त्याच्याकडे अचानक जास्त पैसे दिसू लागले आहेत का? किंवा त्याच्याकडे महागड्या वस्तूंचा संग्रह वाढला आहे का?



उपाय :  ह्या सर्व गोष्टी तुमच्या मुलामध्ये दिसू लागल्या असतील तर समजा की तुमचे मूल चुकीच्या संगतीत आहे. नवीन वा जुन्या मित्रांचे वर्तन पाहून तो चोरी कराला शिकला आहे. त्यांच्याकडून त्याने त्यांचे अनेक दुर्गुण उचलले आहेत. त्यावर मता करण्यासाठी तुम्ही त्याच्या मित्रांवर लक्ष ठेवायला पाहिजे. मित्रांना घरी बोलवण्यासाठी त्याला सुचवले पाहिजे. ते घरी आल्यावर त्यांच्यासाठी वेळ दिला पाहिजे. त्यामुळे त्याच्या चांगल्या मित्रांमध्ये तुमच्या मुलासाठी जबाबदारी वाढेल. खराब मित्र साथ सोडून देतील किंवा ते स्वत:सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करतील. मुलांना जास्त वेळ रिकामे राहू देऊ नका. त्यांच्या रिकाम्या वेळात त्यांना काही तरी कला शिकण्याचा क्लास लावून त्यांचे मन त्यात रमवा. 
 
नैराश्य
नैराश्य सर्वांनाच थोडं फार असू शकतं, पण हे केव्हा जास्त वाढू लागते त्याकडे लक्ष ठेवणे पालकांची जबाबदारी आहे. 'टीनएजर्स' ना अभ्यास व परीक्षा, आपले भविष्य, प्रेमसंबंध यामुळे नैराश्य येऊ शकते. मुली मासिक पाळीमुळे तणावात राहतात. तुमचे मूलसुद्धा डिप्रेशनचे शिकार असल्यास त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तुमचे मूल त्याच्या खोलीतच जास्त वेळ रहातो काय किंवा आपल्या छंदांकडे दुर्लक्ष करतो आहे काय? नेहेमी डोकेदुखी किंवा अंगदुखीची तक्रार करतो काय?

उपाय : ही लक्षणे बर्‍याच काळापर्यंत राहत असतील तर त्याची कारणे जाणून घेणे फारच आवश्यक आहे, भावनांना समजून घेणे जरूरी आहे आणि आत्महत्या किंवा पळून जाण्यासारख्या गोष्टीसंदर्भातही त्यांच्याशी चर्चा करावी. त्यांना रागावू नये, त्यांच्याशी प्रेमाने बोलावे. तुमच्याकडून त्याच्या समस्या सोडवल्या जाऊ शकत नसतील, तर मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा कौन्सिलरकडे न्यावे.

स्मोकिंग/ दारू पिणे 
टीनएजर्स या सवयींच्या आहारी गेले तर ते या गोष्टी लपवण्याचा भरपूर प्रयत्न करतात. म्हणून तुम्हालाच त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे. तुमचे मूल च्युईंगम खातो काय? तो हेवी फरफ्यूम, डियो किंवा आफ्टरशेव लोशन लावायला लागला आहे काय? त्याचा जास्त वेळ मित्रांकडे जातो काय?

उपाय : मुलांना या सर्व वाईट सवयींचे दुष्परिणाम सांगायला पाहिजे. त्याचे असं वागणे त्याच्या मित्रांच्या दबावाचाही भाग असू शकतो. त्याला वास्तवाची जाणीव करून द्यायला हवी. नियमन कसे करावे हे त्याला समजून सांगायला हवे.

ड्रग्स घेणे
तुमचे मूल घरातील कामे किंवा इतर कामात सहभागी होत नाही काय? तो आपल्या लुक आणि कपड्यांच्या बाबतीत निष्काळजी झाला आहे? त्याची खोली पहिल्यापेक्षा खराब झाली आहे? तो त्याचे फोन कॉल्स लपवायला लागला आहे? त्याचे मित्र बदललेले आहे? तो घरच्या लोकांशी दूर दूर राहायला लागला आहे? त्याची पैशाची मागणी वाढू लागली आहे का?

उपाय : त्याच्या खोलीची तपासणी केली पाहिजे. बहुधा तुम्हाला काही असं सापडेल ज्याचा संबंध त्याच्या परिस्थितीशी असेल. त्याच्या डोळ्यांकडे लक्ष दिले पाहिजे. ड्रग घेणाऱ्या मुलांचे डोळे लाल किंवा पिवळे असतात. त्याला ड्रग्सचे दुष्परिणाम सांगायला पाहिजेत. आवश्यक असल्यास त्याला 'ड्रग रिहेबिलेशन सेंटर'मध्ये एडमिट करावे. त्यासाठी घराची इज्जत किंवा लोकं काय म्हणतील या गोष्टींकडे लक्ष देऊ नये.

लहान वयात सेक् स 
तुमचे मूल आपल्या बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड बरोबर जास्त वेळ घालवत आहे? तो एकदम आत्मविश्वासपूर्ण किंवा प्रौढासारखा वागू लागला आहे? त्याच्या/तिच्या खोलीत तुमचे जाणे त्यांना आवडत नसेल? तुमच्या मुलीला ब्लेडर इंफेक्शन तर झालं नाही ना? कारण पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर असं होणे शक्य आहे.

उपाय : वर दिलेले लक्षण सेक्श्युअली एक्टिव टीनएजर असू शकतात. त्यांच्याशी या विषयावर प्रेमाने बोलावे त्यांना भाषण देणे टाळावे. त्यांना सांगावे की प्रत्येकाला आपले वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. परंतु भारतीय संस्कृतीत सेक्स ही लग्नानंतरच करण्याची बाब आहे हे पटवून द्यावे. कमी वयात सेक्स केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते उदा. - गर्भधारणा होणे, लैंगिक संबंधांतून पसरणारे रोग, लग्नानंतर गर्भधारणेत येणार्‍या अडचणी याविषयी त्याला माहिती द्यावी आणि सावधही करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

चायनीज चिकन रेसिपी

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

आरोग्यासाठी फायदेशीर पेरूची भाजी