Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेम म्हणजे काय?

what is love
Webdunia
प्रेम बीम म्हणजे काय फक्त मोठाल्या गिफ्ट्स बिफ्ट्स देणं नसतं…
त्याच्या शर्टाचं तुटलेलं बटण शिवणं म्हणजे सुद्धा प्रेमच असतं….…
 
तीच्या सोबत बसून मटार सोलणं म्हणजे सुद्धा प्रेमच असतं….…
कितीही उशीर झाला तरी त्याच्यासाठी जेवायला थांबणं सुद्धा प्रेमच असतं
रिकाम्या बाटल्या भरून त्याने फ्रीजमध्ये ठेवणं सुद्धा प्रेमच असतं….…
रविवारी वेळ काढून त्याचं कपाट लावणं सुद्धा प्रेमच असतं….…
रविवारी तिच्यासाठी त्याने चहा बनवणं सुद्धा प्रेमच असतं….
आधी तिने आवरून त्याच्यासाठी गिझर लावणं सुद्धा प्रेमच असतं….…
त्याने मोबाईल चार्ज झाल्यावर तीचा मोबाईल चार्जिंगला लावणं सुद्धा प्रेमच असतं….…
गोड बातमी त्याला हळूच कानात सांगणं सुद्धा प्रेमच असतं…..
तिला whatsapp वर “दुपारची गोळी घेतलीस का?” विचारणं सुद्धा प्रेमच असतं…
डोहाळ जेवणात त्याच्यासोबत फोटो काढतांना लाजणं सुद्धा प्रेमच असतं….
तिला operation साठी आत नेल्यावर त्याने देवाला हात जोडणं सुद्धा प्रेमच असतं…

प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…
साठीनंतर तीचा हात धरून रस्ता क्रॉस करणं सुद्धा प्रेमच असतं….

प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…
त्याला जास्त चावता येत नाही म्हणून पोळी कुस्करून देणं सुद्धा प्रेमच असतं….

प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…
तिची देवपूजा सुरु असतांना त्याने फुलं आणून देणं सुद्धा प्रेमच असतं...
 
प्रेम बीम म्हणजे काय फक्त तरुणांचंच नसतं…
दुसऱ्या गुलाबजामला हात लावताच त्याला तिने रागावणं सुद्धा प्रेमच असतं....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

चिकन मोमोज रेसिपी

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी

Beauty Tips ,White Hair Treatment ,चिंच पांढरे केस काळे करेल, इतर फायदे जाणून घ्या

खजूराच्या बिया शरीराला देतात हे 5 जादुई फायदे,जाणून घ्या

पुढील लेख
Show comments