Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेम जागृत करणारे हार्मोन्स

वेबदुनिया
आपल्याला आवडत्या व्यक्तीकडे जाताना आपली पावले का अडखळतात? ह्रदयात धडधड का होते? बोबडी का वळते? तळहाताला घाम का सुटतो? या प्रश्नाची उत्तरे कदाचित तुम्हाला माहित नसतील. याला तुम्ही प्रेम म्हणाल. पण वैद्यकिय भाषेत या 'ऑक्सीटोसीन'लाच 'लव्ह हार्मोन्स' म्हटले जाते.

तारूण्याच्या उंबरठ्यावरच आपल्या शरीरात हे हार्मोन्स प्रवाहित व्हायला लागतात. या हार्मोन्समुळे प्रेमरस स्त्रवायला लागतो. पहिल्याच नजेरत आपण 'तो' तिच्याकडे आणि 'ती' त्याच्याकडे आकर्षित होतात आणि आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका खातात.

टेस्टॉस्टेरोन-
प्रेम भावनेने आपली कोणावर नजर अडून बसते. तेव्हा आपल्या शरीरात संचार करत असलेल्या रक्तात हार्मोन्स मिसळतात. रक्तात मिसळलेले हार्मोन्स शब्दरूप धारण करून मनातील प्रणयी इच्छा जागृत करतात. पुढे जाऊन त्याचे रूपांतर प्रणयात होते. याला पुरूषी हार्मोन्स असे म्हणतात. मात्र, हे हार्मोन्स महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाहित होतात. मीलनाची उर्मी जागृत होते.

टेस्टॉस्टेरोन कमी का होतात?
पुरूष व महिलामध्ये निर्माण होणारा प्रचंड तणाव, कंबरदुखी, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी व्याधीमुळे टेस्टॉस्टेरोन निष्क्रीय होतो. अति मद्य सेवनही टेस्टॉस्टेरोन संपुष्टात आणण्‍यास कारणीभूत ठरत असते.

टेस्टॉस्टेरोनमध्ये कशाने होते वाढ?
व्यायाम व तणावमुक्त जीवनशैली टेस्टॉस्टेरोनच्या वृध्दीस कारणीभूत ठरते. बदाम, शेंगदाणे व अक्रोड रोज खाण्याने आपल्या शरीरात टेस्टॉस्टेरोनचे प्रमाण राखले जाते. प्रसंगी डॉक्टरही हार्मोन्सचे इंजेशनही देतात.

एस्ट्रोजनची उत्पत्ती -
पुरूष कितीही ताकदवान असला तरी त्याच्या शरीरात एस्ट्रोजन हार्मोन्स उत्पन्न होत असतातच. महिलानाही या हार्मोन्सची आवशक्यता असतेच. एस्ट्रोजन हार्मोन्स महिलाच्या मासिक चक्राला नियंत्रित ठेवते. याच हार्मोन्समुळे स्त्री पुरूषाच्या सहवासात मंत्रमुग्ध होत असतो. महिलामध्ये एस्ट्रोजनचे प्रमाण अधिक असल्याने ती अधिक सुंदर व आकर्षक वाटते.

एस्ट्रोजन कशाने कमी होतात?
तणाव
जलद गतीने वजन कमी होणे
खूप डायटींग करणे

एस्ट्रोजन कशाद्वारे वाढवाल?
डॉक्टराच्या सल्ल्याने औषधांचे नियमित सेवन.
गहू व सोयाबिनचे पदार्थ अधिक सेवन.
दररोज दोन कप कॉफी घेतल्याने एस्ट्रोजन वाढवता येते.

 
ND
ऑक्सीटोसीन-
ऑक्सीटोसीन नावाचे हार्मोन्स नात्यामधील ऋणानुबंध वाढवतो. महिला-पुरूषांच्या मेंदूत तयार होणारा हा हार्मोन्स आहे. याने तणाव कमी होतो तसेच प्रजननाला गती मिळते. नवजात शिशू व त्याची माता यांच्यातील नाते दृढ होते.

ऑक्सीटोसीन कशामुळे कमी होतो?
शारीरिक स्पर्शाच्या अभावामुळे ऑक्सीटोसीन हार्मोन्स संपुष्टात येते.

ऑक्सीटोसीन कशाने वाढवाल?
खजूर अधिक सेवन केल्याने ऑक्सीटोसीन हार्मोन्सची वृध्दी करता येते. महिलांकडे प्रणयाच्या दृष्टीने पाहणे, महिलांना स्पर्श करणे किंवा अलिंगन देणे या क्रियेत मोठ्या प्रमाणात ऑक्सीटोसीन हरमोन्स प्रवाहित होत असतो.

नॉरएपिनेफ्रिन-
नॉरएपिनेफ्रिन नावाचा हार्मोन्स पहिल्या स्पर्शच्या वेळी मनात भीती निर्माण करत असतो. या हार्मोन्समुळे पुरूष अधिक उत्तेजित होत असतात. तसेच नॉरएपिनेफ्रिन हार्मोन्सचे प्रमाण वाढल्याने त्याचा प्रतिकूल परिणामही होत असतो.

डोपपामिन-
डोपपामिन हरमोन्सला 'फील गुड' केमिकलही म्हटले जाते. पहिली भेट...पहिली नजर...आयुष्यभराची करून टाकण्याची ताकद या हरमोन्समध्ये असते.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा