Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनाकडून शरीराकडे!

डॉ. प्रदीप पाटील

Webdunia
ती त्याच्या प्रेमात पूर्ण बुडून गेली. एवढी की ऐके दिवशी ती त्याच्या मिठीत असताना तिचा स्वत:वरचा ताबा संपला. त्याच्या प्रत्येक रोमँटिक शब्दांना- हालचालींना तिने खुलून प्रतिसाद द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू शरीरसंबंधाच्या धुंदपणात ती बेधुंद होऊन गेली. तिचा पहिला उत्कट अनुभव.

प्रेमात पडणे ही मानवाच्या जीवनप्रवासातील एक अविवेकी अवस्था आहे. कारण मेंदू अशावेळी सुंद झालेला असतो. यातून अनेक गोष्टी निर्माण होतात.

प्रेमात पडणे ही गोष्ट सेक्ससाठीचा दरवाजा असतो. हे प्रेमात पडणे घडवून आणतात. डोपामीन, ई, ऑक्सिटोसीस आणि टे, ही रसायनं मेंदूत अशावेळी डोकावतात. प्रेमात असताना मेंदूचे जे भाग घेतात तेच भाग आपण इतर कोणत्याही व्यसनांच्या आहारी गेल्यावर कार्य करीत असतात. भीती निर्माण करणारी बदामीकार ग्रंथी आणि सिग्यूलेट कॉर्टेक्स भाग ज्यामधून चिकित्सा करण्याची वृत्ती तयार होते हे दोन्ही भाग तात्पुरते बंद होतात. या लाटा त्याच होत ज्या अफू, गांजा, चरस इत्यादी मादक पदार्थांच्या सेवनाने होतात. ही मादक द्रव्ये आणि प्रेम मेंदूतील 'रिवार्ड सिस्टिम' म्हणजे 'बक्षिसांची खैरात करणारी यंत्रणा' उत्तेजित करते. त्यामुळे रसायने स्त्रवू लागतात आणि प्रेमात बुडणे घडते. इथे तो आणि ती 'एकमेकांच्या आहारी' जातात इतकेच.

प्रेमिकांना म्हणूनच पहिले सहा महिने सतत आणि सतत एकत्र राहावेसे वाटते. एकमेकांपासून दूर जाणे क्षणभरही सहन होत नाही. स्वत:पेक्षा आपल्या जोडीदाराच्या भावना जपणे, काळजी घेणे, भले चितणे सुरू राहते.

हेमाची अवस्था म्हणूनच तर पूर्णपणे बदलली. तो २-३ दिवस भेटला नाही तर ते स्पर्श त्या मिठ्या... तिला स्वस्थ बसू देत नसत. आणि तिची 'भूक' तिला अस्थिर करून सोडे. साधारण असा समज आहे की ही भूक म्हणजे म्हणजे, ही ओढ म्हणजे मानसिक क्रिया आहे. मात्र ते खरे नाही. ही ओढ शारीरिकच असते. दारू पिणाऱ्याची दारू दोन-तीन दिवसांसाठी बंद केली की तो जसा तडफडतो तीच तडफड इथे असते. ड्रग विथड्रावल म्हणतात तशी आणि अशा तीव्र ओढीतून आपल्या जोडीदाराविषयी झटपट निर्णयही घेतले जात असतात.

तो तीन दिवस भेटला आणि तेव्हा त्यालाही चौथ्या दिवशी भेटल्यावर दाटून आले आणि त्याने 'प्रपोज'ही केले? तात्पुरते वेगळे झालो की पुन्हा लगेचच भेटण्याची ओढ वाढते आणि अस्थिरताही! त्यामुळे निर्णय फटाफट होतात आणि पुन्हा त्याच लाटा!! त्यांची एक साखळी बनते. कुरवाळणे- चुंबन घेणे डोळ्यात डोळा घालून पाहणे- मिठीत हरवणे-योनीलिग संबंधाचा उत्कट आनंद घेणे. ऑक्सिटोसीन आणि डोपामीनचे काम फत्ते होते.

हेमासारख्या अनेकींच्या आया आपल्या मुलीला सल्ला देत असतात. आपल्या नव्या मित्राशी जास्त जवळीक करू नकोस. त्या का म्हणतात तसे? गोंजारणे आणि मिठी यामुळे मेंदूत ऑक्सिटोनिन स्त्रवू लागते. खास करून स्त्तियात जास्त. त्यामुळे त्या मिठीत घेणाऱ्याच्या अधीन होतात. एवढेच नव्हे तो जो बोलेल, त्यावर डोळे झाकून त्या विश्वास ठेवतात. 

प्रयोगातून असेही दिसून आले आहे की सरासरी २० ते २२ मिनिटे मिठीत राहिले की ऑक्सिटोसीन नैसर्गिकपणे झिरपत राहते आणि त्यामुळे विश्वास यंत्रणा कार्यरत होते. म्हणून अशा कोणत्याही पुरुषाच्या मिठीत अगोदर जाऊ नका जोवर तुम्हाला त्याच्याविषयी विश्वास वाटत नाही. कारण त्यानंतर ई व प्रोजेस्टेरॉन स्त्रवू लागतात आणि त्यामुळे पुन्हा ऑव्हिटोलीन... असे चक्र सुरू राहते. त्यामुळे बंध आणखी घट्ट होतात.

हे असेच सुरू राहिले की अगदी थोडे जरी संप्रेरक स्त्रवले तर 'त्या' सर्व भावना शरीरास घेरून टाकतात. मग ही संप्रेरके निव्वळ आठवणीमुळेही स्त्रवतात. काहीतरी पाहिल्यावर स्त्रवतात. निमित्त फक्त पुरेसे की... हे जे सारे घडते ते सारे मेंदूत 'तयार' असते. जन्मापासून. त्यामुळे प्रेमात पडून असे सारे अनुभवणे हे सारे नैसर्गिकपणे घडते.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

घरातील झाडू जास्त काळ टिकवण्यासाठी या ट्रिक नक्की अवलंबवा

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा