तुमचं मन आज डेटींगवर जाण्यासाठी तयार नसेल तर शांतपणे तसं सांगा... पण, सोबतच भविष्यात आपण जाऊया असं सांगायलाही विसरू नका. त्या व्यक्तीला प्रेमानं सांगा की आज नाही, पण तुझ्याबरोबर डेटींगवर यायला मला नक्की आवडेल.
आपली प्राथमिकता मनमोकळेपणानं व्यक्त करा....
आपली प्राथमिकता मनमोकळेपणानं व्यक्त करा....
तुमच्याबरोबर डेटींगवर जाण्याची इच्छा कुणी व्यक्त केली तर त्याला अगोदर तुमची प्राथमिकता मनमोकळेपणानं सांगा... ती व्यक्तीही तुमचा अभ्यास, नोकरी किंवा आर्थिक गोष्टींशी संबंधीत असेल तर त्याच्याशी स्पष्टपणे बोला. यामुळे एकतर तुमची समस्या हलकी होईल आणि दुसरं म्हणजे पुढच्या वेळी ती व्यक्ती तुमची प्राथमिकता लक्षात ठेवेल.
बहुतेकदा तुम्ही ज्या व्यक्तीला केवळ मित्र मानता त्या व्यक्तीला तुमच्याबद्दल प्रेम भावना निर्माण होऊ शकते. अशावेळेस त्यानं तुम्हाला डेटींगवर जाण्यासाठी विचारलं तर त्या व्यक्तीला तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता ते स्पष्टपणे सांगा. होऊ शकतं की त्याला त्यावेळेस वाईट वाटेल पण भविष्यात त्या व्यक्तीला अंधारात ठेवण्यापेक्षा आणि आणखीन पेचात पडण्यापेक्षा / पाडण्यापेक्षा हे सोपं आहे. स्वत:च्या मनावर कोणताही दबाव घेऊ नका.
तुम्हाला त्या व्यक्तीला सामोरं जाणं कठिण वाटत असेल किंवा तुमच्या हावभावांचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकेल अशी स्थिती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला मॅसेजही करून डेटींगवर न जाण्याविषयी सांगू शकता.
डेटींगवर जाण्यासाठी नकार दिला तर मनात अनेक विचार येतात पण तेव्हा ठामपणे नकार देणं हेच गरजेचं असतं. त्याला कारणंही वेगवेगळी असतात. त्यामुळे पहिल्यांदा नकार द्यायला शिका. खोटं बोलून तुमच्या समोरच्या माणसाचा तुमच्यावरच्या विश्वासाला तडा जाण्याची शक्यता असते.