Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नात्यात दुरावा आणतात या 5 गोष्टी, काळजी घ्यावी

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (13:06 IST)
नवरा - बायको यांच्यात एक घट्ट असं नातं असतं आणि असे म्हणतात की हे नातं एक किंवा दोन जन्मांचे नसून सात जन्माचे असतं. परंतु आयुष्यात बऱ्याच वेळा अशी परिस्थिती येते ज्यामुळे हे घट्ट असलेले नाते निव्वळ काही शुल्लक कारणामुळे तुटतात. नातं तुटायचा परिणाम दोंघावर पडतो. अशी कोणती कारणे आहे ज्यांचा मुळे हे नाते दुरावतात हे जाणून घेणे आवश्यक आहे-
 
* लग्नाच्या पूर्वी एकमेकांना समजून घेणं -
लग्न ठरल्यावर मुलगा आणि मुलीमध्ये चांगले संभाषण होणं गरजेचे असते. या मुळे ते दोघे एकमेकांचा स्वभाव आणि विचारांची देवाण घेवाण करू शकतात. आपसात सामंजस्यपणा असेल तर दोघांचे नाते चांगले जुळतील. पण आजच्या काळात देखील अशी काही कुटुंबे आहेत जिथे मुलगा आणि मुलगी भेटणं तर नाही पण त्यांना मनमोकळेपणे बोलणं देखील अशक्यच असत. या मुळे त्यांना भावी आयुष्यात एकमेकांशी जुळवून घेणं अवघड होतं.
 
* लग्नानंतरचा दुरावा - 
नवरा बायको दोघेही कामाला जाणं हे आजच्या आधुनिक काळात सामान्यच आहे. बऱ्याच वेळा काही लोक कामाच्या ठिकाणी मोठ्या पॅकेजच्या आमिषाला भुलून एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतात. या मुळे त्यांच्या नात्यात दुरावा येतो आणि आपसातील प्रेम कमी होतं. एकमेकांबद्दलचा विश्वास हळू-हळू कमी होऊ लागतो.
 
* ऑफिसमध्ये जास्त वेळ देणं - 
बऱ्याच वेळा ऑफिसमध्ये कामाचा जास्त ताण असल्यास काही वेळ जास्त द्यावा लागतो, त्यामुळे घरात मतभेदाचे वातावरण बनतात. जशे आपण बाहेरची जबाबदारी पूर्ण करता त्याच प्रमाणे दोघांना एकमेकांसाठी पुरेपूर वेळ द्यायला पाहिजे. बायकोने देखील आपल्या घराकडे तितक्याच जातीने लक्ष दिले पाहिजे. कामाचा जास्तीचा ताण आपल्या नात्यात दुरावा आणतो आणि हळू-हळू करून हे घट्ट नाते कमकुवत होऊ लागतात. म्हणून दोघांना घरात आणि ऑफिसात संतुलन ठेवता आले पाहिजे.
 
* अधिक व्यस्तता -
आपले दररोजचे जीवन इतके धावपळीचे झाले आहेत की एकमेकांसाठी वेळ काढणं अशक्य झाले आहे. या नात्यातील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी काही वेळ एकमेकांसाठी काढावा. या साठी आपण आपल्या जोडीदारासह बाहेर फिरायला जाऊ शकता. या शिवाय आपण दोघे सकाळच्या वेळ जोडीने वॉकला जाऊन देखील घालवू शकता. या मुळे आपले आरोग्य तर निरोगी राहीलच तसेच नाते देखील निरोगी राहतील.
 
* शंका करणं टाळा -
मित्र बनवणं चुकीचे नसतं. आजच्या काळात मुले-मुली एकत्र काम करतात. म्हणून आपल्या जोडीदारावर सहकाऱ्याला घेऊन शंका करू नये. 
 
शंका करणं ही अशी कीड आहे जी नात्यात लागली की आपल्या बऱ्याच वर्षाच्या नात्याला देखील संपवून टाकते. लक्षात ठेवा की आपल्या शंकेखोर असण्याचा स्वभावामुळे आणि दुर्लक्षित केल्यामुळे एखादा बाहेरचा व्यक्ती आपल्या सुखी वैवाहिक जीवनात विष देखील कालवू शकतो. तसेच आपल्या नात्यात दुरावा देखील आणू शकतो.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments