Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमात मुलींनी दबावाखाली बदलू नये या 6 सवयी

Webdunia
प्रेमात पडल्यावर लोकं स्वप्नांच्या दुनियेत जगू लागतात. प्रेमाला डोळे नसतात हे अगदी खरं होतं जेव्हा मुली आपल्या पार्टनरच्या हिशोबाने जगू लागतात. आपलं मन मारून त्याच्या आवडीप्रमाणे जगू लागतात परंतू अशात एक काळ निघाल्यावर स्थिती बिघडू लागते. म्हणून रिलेशनशिपमध्ये मुलींना आपल्या सवयी बदलायला नको.
1. ड्रेसिंग स्टाइल
सर्वात आधी मुलींच्या ड्रेसिंगवर याचा प्रभाव जाणवतो. मुलं आपल्या प्रेयसी किंवा बायकोला त्याच्या आवडीप्रमाणे कपडे घालायला बाध्य करतात. एखाद्याला त्यांची आवड मान्य केली तरी आपल्या पूर्ण स्टाइलवर त्याचा प्रभाव पडता कामा नये. अशात स्पष्ट सांगा की आपल्याला कोणत्या प्रकाराचे कपडे परिधान करायला आवडतात आणि कोणते नाही.
 
2. करिअर
अनेकदा मुली आपले स्वप्न आणि आपल्या करिअरबद्दल विचार करणे सोडून देतात आणि प्रियकर किंवा पतीप्रमाणे वागू लागतात. पार्टनरला सर्व सुविधा देत असेल तरी त्यावर अवलंबून राहू नका. आपले शिक्षण, आपली योग्यता आपण स्वत:च्या मर्जीच्या करिअरमध्ये राहूनच सिद्ध करू शकतो.

3. जुने मित्र-मैत्रिणी
अनेकदा पार्टनरला आपल्या जुन्या मित्रांपासून अॅलर्जी असते. जेव्हाही मित्र-मैत्रिणींना भेटण्याची गोष्ट निघाली की आपल्यात वाद निर्माण होत असतील तर त्याला स्पष्ट सांगा की नवीन नात्यांसाठी पूर्वीचे नाते तोडणे योग्य नाही. आपल्या मित्रांनी हे पार्टनरबरोबर उठण्या बसण्याची सवय टाका.
 
4. सेक्स 
सेक्स नेहमी पार्टनरच्या सहमतीने झाले पाहिजे. सेक्स करण्याची इच्छा नसल्यास स्पष्ट सांगावे. पार्टनरच्या इच्छेप्रमाणे मन मारून सेक्ससाठी तयार होण्याने मधुर संबंध स्थापित होणे शक्यच नाही. उलट दुरावा येण्याची शक्यता वाढते. 

5. मुलं
लग्नाच्या पाठोपाठ मुलं नको हवं असल्यास पती आणि पेरेंटशी बोला. जबाबदारी घेण्यासाठी मानसिक आणि शारीरिक रूपाने फीट असणे गरजेचे आहे, हे त्यांना स्पष्ट करा.
 
6. आहार
आपला पार्टनर उशिरा घरी येत असेल तर जेवण्यासाठी त्याची वाटत बघत बसणे योग्य नाही. अशात आपली दिनचर्या अस्त-व्यस्त होऊ शकते. उपाशी राहून प्रेम सिद्ध करण्यात कुठलीही समजदारी नाही. म्हणून आपण आपल्या शेड्यूलप्रमाणे आहार घ्यावा कारण घराला आपली अधिक आवश्यकता आहे अशात आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
 
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Face Beauty Tips : चेहऱ्यावर पिंपल असेल तर हे करा

गरोदरपणात पोहे खाल्ल्याने मिळतील हे 5 आरोग्य फायदे, जाणून घ्या

आत्मविश्वास वाढवण्यासाठी रोज करा ही योगासने, जाणून घ्या फायदे

अकबर-बिरबलची कहाणी : विहिरीचे पाणी

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

पुढील लेख