Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips : या गोष्टी नात्यातील तणावापासून वाचवतील जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (20:08 IST)
जिथे प्रेम असते तिथे वाद ही असतो. पण, हा होणारा वाद आपल्या अति जास्त प्रेमामुळे होणारा आहे का?  नात्याला तणावापासून  कसे वाचवायचे, जाणून घ्या. आपल्याला एखाद्या नातेसंबंधात अडकल्यासारखे वाटते का ?  आपला जोडीदार आपली फसवणूक करेल अशी भीती वाटते?  
नात्याबद्दल प्रत्येकाला काळजी वाटते  .पण, कधी कधी या चिंतेने नात्याचा श्वास गुदमरतो आणि उरतो तो फक्त राग, आणि वाद आणि अशा परिस्थितीत  उगीच ची चिंता ही नात्यासाठी कधी समस्या बनत आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. आपणआपल्या  काही वर्तनावर एक नजर टाका आणि आपण विनाकारण काळजी  तर करत नाही हे पहा. अशाप्रकारे तणावां पासून मुक्ती मिळवा, या टिप्स अवलंबवा .
 
1 सकारात्मक राहा:  जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या व्यवहाराचे सकारात्मक पैलू पहा. त्याची परिस्थिती आणि त्याच्या अपेक्षा यांच्यात समतोल शोधणे देखील समस्येचे समाधान करणारे ठरू शकते. आपला आत्मविश्वास देखील आपली समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. नेहमी सकारात्मक राहा.
 
2 विश्वास ठेवा: कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर अवलंबवून असतो. एकमेकांवर विश्वास बनवून ठेवा. आपले नको ते विचार करणे आपले नाते खराब करू शकते. 
 
3 वर्तमानात जगा: आपण आपल्या जोडीदारासह असताना त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. भविष्य किंवा भूतकाळाच्या गोष्टी विसरून जा. चिंते पासून वाचण्यासाठी, वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. जुन्या गोष्टींची उजळणी केल्याने आपल्या तणावात वाढ होऊ शकते. गोष्टी पुन्हा पुन्हा उजळण्या ऐवजी ते संपवण्याचा प्रयत्न करा आणि नवीन मार्ग शोधा.
 
4 समजून घेणे महत्त्वाचे: जोडीदारावर प्रेम करण्यासोबतच त्याला समजून घेण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या कामाचे स्वरूप, प्रकार, वागणूक इत्यादी समजून घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
 
5 बोलणे महत्त्वाचे आहे : आयुष्यात वेळेचा अभाव देखील आपल्या नातेसंबंधावर परिणाम करतो. शंका, प्रश्न आपल्या चिंतेला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. आपल्या मनात काहीही प्रश्न असल्यास मोकळेपणाने बोलून घ्या. एकमेकांशी बोलणे महत्त्वाचे आहे. 
 
6 मोकळीक द्या: आपल्याला  हे समजून घ्यावे लागेल की आपल्या जोडीदाराच्या स्वतःच्या गरजा, आवड, मित्र आहेत. आपण त्यांच्या आवडीवर नियंत्रण घालण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना त्यांचा आवडीने जगण्याची मोकळीक द्या. आपण त्यांच्यावर लावलेले निर्बंध आपल्या नात्यात दुरावा आणू शकतात.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

महिलांनी स्तनपान करताना ब्रा घालणे योग्य आहे की नाही?जाणून घ्या

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

पुढील लेख
Show comments