Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपण कोणत्या प्रकाराच्या लव्ह मध्ये आहात? प्लेफुल, लस्ट, इश्क की....

Webdunia
प्रेम म्हटलं की अनेक भावना बाहेर पडू लागतात. प्रेमाचे अनेक रूप असतात. यातून आपल्याही जीवनात कोणत्या न कोणत्या रूपात प्रेम जाणवलं असेल. अनेक लोकं असेही असतात ज्यांना जीवनाच्या वेगवेगळ्या पायरीवर वेगवेगळ्या प्रकाराचं प्रेम होत असतं. तर जाणून घ्या आपणही ज्या प्रेमात पडला ते कोणत्या प्रकाराचं प्रेम आहे..
 
इरोटिक लव्ह
या प्रकाराचं प्रेम सेक्सुअलिटी आणि इच्छांनी भरलेलं असतं. भावुकतेने भरलेल्या या प्रेमात आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होतात तेव्हा हे अनुभवतं. हे प्रेम दोन्ही लोकांच्या इच्छेमुळे उत्पन्न होतं. यासाठी रोमँटिक रिलेशनची गरज नाही. हा लस्टचा एक प्रकार आहे असे म्हणायला हरकत नाही.
 
युनिव्हर्सल लव्ह
प्रेमाच्या या प्रकारात अचानक एखाद्या अनओळखी व्यक्ती प्रती आकर्षण वाढतं कारण ती व्यक्ती कठिण परिस्थितीत असते. हा मानवी व्यवहार आहे आणि हे प्रेम सहानुभूतीसारखे आहे. इतर लोकांची काळजी वाटणे साहजिक आहे म्हणून याला युनिव्हर्सल लव्ह म्हणतात.
 
निःस्वार्थ लव्ह
युनिव्हर्सल लव्हचे दुसरे पाऊल आहे. असे प्रेम ज्यात आपण समोरच्याकडून कुठलीही अपेक्षा करत नाही. हे एकाप्रकाराचे आध्यात्मिक प्रेम असावे कारण याचा मॅजिक काही औरच आहे.
 
प्लेफुल लव्ह
या प्रेमात सुरुवातीला दोघेही हलक्या मूडमध्ये असतात आणि एकमेका प्रती आकर्षण देखील असते. यांना एकमेकाची कंपनी खूप आवडते. दोघेही प्रेमाची ही वेळ खूप मजे घालवतात. हे प्रेम दोघांमध्ये चांगल्या मैत्रीचा फील देते.
 
लस्ट लव्ह
यात केवळ शरीराची भूक असते. आपल्या मनात नेहमी पार्टनरसोबत शारीरिक संबंध स्थापित करण्याचा विचार असतो. या प्रकाराच्या प्रेमात काळांतर दुरावा निर्माण होतो.
 
एकतर्फी लव्ह
सर्वात धोकादायक आणि आव्हानाने भरपूर असतं हे प्रेम. आपण एखाद्यावर खूप प्रेम करत असला तरी समोरच्या त्याची काही किंमत नसते. आपलं प्रेम जुनूनी होऊन बसतं की समोरचा त्याला गांर्भीयाने घेत नाही. या प्रकाराच्या प्रेमात पडणे धोकादायक ठरू शकतं.
 
प्लेटोनिक लव्ह
या प्रकाराच्या प्रेमात सेक्स किंवा रोमँटिक फिलिंग नसते आणि समोरच्याकडून कुठली अपेक्षादेखील नसते. हे प्रेम दोन जीवलग मित्रांमध्ये बघायला मिळतं. यात नेहमी समोरच्याची साथ द्यायचा हाच एक उद्देश्य असतो.
 
ट्रू लव्ह
खरं लव्ह कालांतर नंतरही फिकट पडत नाही. ती ओढ, काळजी, सोबत राहण्याची इच्छा, आणि कुठल्याही अपेक्षा नाही, हे खरं प्रेम असतं. जीवनात खरं प्रेम एकदाच होतं असे म्हणतात.
 
क्रश लव्ह
लहान वयात किंवा कोणाला पहिल्यांदा बघून मनात येत असलेल्या भावना, त्याला क्रश म्हणतात. मग ते कुणाशीही असू शकतं, एखाद्या सिनेमातील स्टारशी, टिचरशी किंवा शेजारी राहणार्‍या आपल्याहून वयाने कितीतरी मोठ्या व्यक्तीशी.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

कन्सीलर लावल्याने चेहऱ्यावर तडे येतात, या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

पुढील लेख