साहित् य : 1 किलो तांदूळ, एक किलो चिकन, २५० ग्रॅम रिफाइंड तेल, ५०० ग्रॅम चिरलेला कांदा, 1 कप टोमॅटो चिरलेले, एक कप दही, १०-१५ हिरव्या मिरच्या लांब लांब कापलेली, 5 ग्रॅम दालचिनी, वेलची व लवंगा, एक मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार.
कृत ी : तांदूळ स्वच्छ करून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे मोठे मोठे तुकडे करून घ्यावे. तेल गरम करून त्यात कांदे परतून घ्यावे, नंतर त्यात हिरव्या मिरच्या, वेलची, दालचिनी, लवंगा घालून चांगले परतून घ्यावे.
कांदे चांगले परतून झाल्यावर त्यात आलं-लसूण पेस्ट टाकावे व टोमॅटो घालून परतून घ्यावे. नंतर त्यात चिकनचे तुकडे, दही व मीठ घालावे. चिकनला शिजू द्यावे त्यात तांदूळ व पाणी घालून वर झाकण ठेवून भात चांगला शिजू द्यावा.